राजकारण ही देशाला लागलेली कीड; अभिनेत्री तेजस्विनी पंडीत संतापली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अशा परिस्थितीत लस तसंच बेड्सचा तुटवडा देखील भासतोय. या मुद्दयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना याबाबत एक अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने तिच्या एका पोस्टद्वारे सध्या सुरु असलेल्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे. राजकारण ही देशाला लागलेली कीड असल्याचं तेजस्विनीचं म्हणणं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली पहायला मिळाली.

हे वाचलं का?

तेजस्विनी तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.”

कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या राजकारणावर तेजस्विनी संतापली आहे. तेजस्वीप्रमाणे अभिनेता संदीप पाठकने देखील आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेता संदीप पाठक याने लसीकरणासंदर्भात ट्विट केलं होतं. लसीकरणावरून राजकारण करून नका असं मत संदीपने व्यक्त केलं होतं. तर काही अभिनेत्यांनी सर्वांना लसीकरण करण्यात यावं असंही सुचवलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT