प्रसिद्ध रेसर मिगुएलने सावत्र बहिणीसोबत केलं लग्न; लवकरच होणार बाप
पोर्तुगालचा प्रसिद्ध मोटारसायकल रेसर मिगुएल ओलिवेरा याने स्वतःच्याच सावत्र बहिणीशी संसार थाटला आहे. मिगुएल स्वतःची सावत्र बहीण आंद्रिया पिमेंटा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मिगुएलने आंद्रियासोबत संसार थाटला असून, लवकरच तो बाप होणार आहे. मिुगएल आणि आंद्रिया वयाच्या १३ व्या वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघांनीही या रिलेशनशिपबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगली. त्यांनी कुणालाही हे कळू दिलं नाही. ११ […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पोर्तुगालचा प्रसिद्ध मोटारसायकल रेसर मिगुएल ओलिवेरा याने स्वतःच्याच सावत्र बहिणीशी संसार थाटला आहे.
हे वाचलं का?
मिगुएल स्वतःची सावत्र बहीण आंद्रिया पिमेंटा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.
ADVERTISEMENT
मिगुएलने आंद्रियासोबत संसार थाटला असून, लवकरच तो बाप होणार आहे.
ADVERTISEMENT
मिुगएल आणि आंद्रिया वयाच्या १३ व्या वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत.
दोघांनीही या रिलेशनशिपबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगली. त्यांनी कुणालाही हे कळू दिलं नाही.
११ वर्षे दोघांतील रिलेशनबद्दल कुणालाही कल्पना नव्हती.
मिगुएल आणि आंद्रियाने २०१९ मध्ये पहिल्यांदा त्यांच्यातील रिलेशनशिप मान्य केलं.
आंद्रिया पिमेंटा २४ वर्षांची असून ती मिगुएलच्या सावत्र आईची मुलगी आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार मिगुएलचे वडील पाउलो यांनीच याचा खुलासा केला आहे.
मिगुएलचा जन्म ४ फेब्रुवारी १९९५ मध्ये पोर्तुगालच्या अलमांडा येथे झालेला आहे.
मिगुएलने इन्स्टावर फोटो शेअर करून लग्न केल्याची बातमी दिली.
या आठवड्यात आम्ही आयुष्याला महत्त्वाचं वळण दिलं आहे, असं मिगुएलने म्हटलं आहे.
‘आम्ही लग्न करून प्रेमाला आमच्यापुरतं बंदिस्त केलं आहे. आम्ही आमचा आनंद तुमच्यासोबत वाटू इच्छितो’, असं मिगुएलने पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.
आपल्या पत्नीसोबत आयुष्य जगणार असल्यानं मी स्वतः भाग्यशाली समजत आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार’, असं त्यांनं म्हटलेलं आहे.
लग्न केल्याच्या बातमीनंतर मिगुएलने पत्नी आंद्रिया पिमेंटा गर्भवती असल्याचं सांगितलं.
आंद्रिया पिमेंटासोबतचा आणि सोनोग्राफी केल्याचा फोटोही त्याने इन्स्टावर शेअर केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT