एक अनोखं चॅनल आपल्या भेटीला, पाहा कसं असणार Good News Today

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: केवळ नकारात्मक बातम्या पाहून तुम्ही कंटाळले असाल तर आता आम्ही आपल्यासाठी एक Good न्यूज घेऊन आलो आहोत. जर आपल्याला यापुढे कायम सकारात्मक बातम्या पाहायच्या असतील तर ‘इंडिया टुडे ग्रुप’ एक नवं चॅनल आपल्या भेटीला घेऊन आलं आहे. चांगल्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी आता आपण Good News Today (GNT) हे चॅनल पाहू शकतात. इंडिया टुडे ग्रुपचं आणखी एक हिंदी चॅनल आज (5 सप्टेंबर) लाँच करण्यात आलं आहे. जिथे तुमच्या चेहऱ्यावर सतत हास्य कायम राहील अशाच बातम्या दाखवल्या जातील.

ADVERTISEMENT

Good News Today चॅनल लाँच

इंडिया टुडे ग्रुपचं नवं चॅनल ‘गुड न्यूज टुडे’ हे आजपासून सुरू करण्यात आलं आहे. देशातून चांगल्या आणि खऱ्या बातम्या पोहोचवण्याच्या या अनोख्या विचारसरणीची सुरुवात रविवारी संध्याकाळी 7 पासून झाली आहे. इंडिया टुडे ग्रुपने एक असं चॅनल लाँच केलं आहे की, ज्याच्या माध्यमातून सकारात्मक बातम्या दाखवल्या जातील. या बातम्या दाखवण्यामागचा हेतू एवढाच आहे की, ज्यामुळे समाजात बदल घडवून आणण्यास मदत होईल. हे भारतातील पहिले असे चॅनेल असेल जिथे तुम्हाला फक्त सकारात्मक बातम्या दाखवल्या जातील. ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे अशा अनेक माहित नसलेल्या नायकांच्या कथा इथे पाहायला मिळतील.

हे वाचलं का?

आतापर्यंत ‘आज तक’ आणि ‘इंडिया टुडे’च्या माध्यमातून तुम्हाला देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने सांगितल्या जात होत्या. पण आता इंडिया टुडे ग्रुप एक पाऊल आणखी पुढे टाकत आहे. आता फक्त राजकारण किंवा गुन्हेगारी जगतातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार नाहीत, तर प्रत्येक चांगली बातमी तुमच्या टीव्ही स्क्रीनवरही ‘गुड न्यूज टुडे’च्या माध्यमातून दाखवली जाईल. हे नवीन चॅनेल देखील वेगवान, अचूक, प्रामाणिक असेल, परंतु बातम्या दाखवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आणि अद्वितीय असेल.

बातमी अशी तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल!

ADVERTISEMENT

Good News Today हे एक असं माध्यम असेल ज्याद्वारे देशातील लोकांशी थेट संवाद साधला जाईल. हे अनोखं चॅनल आपण कुठे-कुठे पाहू शकता हे देखील जाणून घ्या सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

तुम्ही Good News Today हे चॅनल टाटा स्कायवर क्रमांक 525, डिश टीव्ही चॅनेल क्रमांक 664, मोफत डिश चॅनेल क्रमांक 13, एअरटेल चॅनेल क्रमांक 322, सन डिश चॅनेल क्रमांक 585, डेन चॅनेल क्रमांक 310, GTPL चॅनेल क्रमांक 240, FW वर चॅनेल क्रमांक 188, SITI चॅनेल क्रमांक 311 वर पाहता येणार आहे.

तर आतापासून या क्षणापासून तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या बातम्या आम्ही गुड न्यूज टुडेच्या माध्यमातून घेऊन आलोय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT