Unlock News : अनलॉक करताना या ३ मुद्द्यांकडे लक्ष द्या – ICMR च्या राज्यांना सूचना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील अनेक राज्य कोरोनाचे निर्बंध शिथील करत असताना ICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ३ गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्यायला सांगितली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना भार्गव यांनी ही माहिती दिली. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉजिटीव्ही रेट, ७० टक्के लसीकरण, कोरोना काळात परिस्थितीचं भान ओळखून वागणे या गोष्टींचा पालन करुन अनलॉकची प्रक्रीया सुरु करता येऊ शकते असं भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे.

“आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखायचं असेल तर सोप्या पद्धतीने तयारी करावी लागेल. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण पॉजिटीव्हीटीचं प्रमाण हे ५ टक्क्यांच्या खाली असेल तिकडे हळुहळु निर्बंध शिथील करता येऊ शकतील. ज्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे अशा लोकांना लस देऊन ७० टक्क्यापर्यंत प्रमाण साधायला हवं. हे साधणं शक्य नसेल तर आधी लसीकरण करुन मग अनलॉकची प्रक्रीया सुरु करता येईल.”

जिल्हा पातळीवर कन्टेनमेंट झोन मध्ये राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसून अनलॉकसाठी प्रशासनाने सावधरित्या पद्धतशीर पावलं टाकणं गरजेचं असल्याचं मत भार्गव यांनी बोलताना व्यक्त केलं. आपल्याला लॉकडाउन हे खूप सावधपणे आणि हळुहळु शिथील करावं लागणार आहे, असं भार्गव म्हणाले. लॉकडाउनचे निर्बंध अशा पद्धतीने शिथील केल्यास राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवू शकतात. परंतू यासाठी लसीकरणावर भर देणं हे पहिलं प्राधान्य असल्याचंही भार्गव यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रुग्णांना दिलासा ! Corona उपचारांचे दर कमी होणार, सरकारकडून नवे दर जाहीर

महाराष्ट्र , दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये आता अनलॉकची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. सध्या देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रुग्ण पॉजिटीव्हीटीचा रेट हा ५ टक्क्यांच्या घरात आहे. सध्या भारताच्या एकूण जिल्ह्यांपैकी ४४ टक्के जिल्ह्यांमध्ये पॉ़जिटीव्हीटी रेट हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. १९.८ टक्के जिल्ह्यांमध्ये हाच दर ५ ते १० टक्क्यांच्या मध्ये आहे. तर ३६ टक्के जिल्ह्यांमध्ये रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर हा १० टक्क्यांच्या वर आहे.

ADVERTISEMENT

दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अनेक राज्य सरकारने लॉ़कडाउनची घोषणा केली ज्यामुळे अनेक भागांत रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. देशाच्या पॉजिटीव्हीटी रेटमध्येही गेल्या काही दिवसांपासून कमालीची घसरण झाली असून २१.३९ टक्क्यांवरुन हा दर ८.३ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत बोलत असताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी भारतात जोपर्यंत अभ्यास करुन निष्कर्ष येत नाहीत तोपर्यंत लसींचा मिक्स डोस देण्यात येणार नसल्याचंही सांगितंल.

ADVERTISEMENT

अदर पूनावाला सुरक्षित भारतात येतील याची काळजी घ्या ! हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

    follow whatsapp

    ADVERTISEMENT