आधी वाटलं कोरोनामुळे ताप कमी होत नसेल, तपासणी केली अन् झालं कॅन्सरचं निदान

मुंबई तक

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला, तरी कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांना त्यामुळे काही समस्या उद्भवताना दिसत आहे. विशेषतः लाँग कोविड अनेकांसाठी घातक ठरला. अजूनही कोविडमुळे अनेक व्याधी आढळून येणारे रुग्ण समोर येत आहे. ब्रिटनमध्ये एका महिलेला कोरोना झाला. कोरोनातून बरं झाल्यानंतरही पहिलेचा ताप कमी होत नव्हता. त्यानंतर महिलेला ल्युकेमिया झाल्याचं निदान झालं. ब्रिटनमध्ये राहत असलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला, तरी कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांना त्यामुळे काही समस्या उद्भवताना दिसत आहे. विशेषतः लाँग कोविड अनेकांसाठी घातक ठरला. अजूनही कोविडमुळे अनेक व्याधी आढळून येणारे रुग्ण समोर येत आहे. ब्रिटनमध्ये एका महिलेला कोरोना झाला. कोरोनातून बरं झाल्यानंतरही पहिलेचा ताप कमी होत नव्हता. त्यानंतर महिलेला ल्युकेमिया झाल्याचं निदान झालं.

ब्रिटनमध्ये राहत असलेल्या ३० वर्षीय सिनॅड हडसन यांना सतत ताप येत होता. ताप कमी होत नसल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं. कोरोनातून बरं झाल्यानंतर होणारा त्रासही त्यांना झाला. मात्र, लाँग कोविडमधून जात असताना सिनॅड हडसन यांना धक्काच बसला. कारण एक प्रकारे कॅन्सर प्रमाणेच असलेला ल्युकेमिया झाल्याचं त्यांना कळलं.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार सिनॅड हडसन त्यांच्या पतीसोबत इबिजा येथे सुट्टी घालवत होत्या. सुट्टीच्या काळातच त्यांनी चाचणी केली. ज्यात त्यांचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला. याबद्दल सांगताना सिनॅड म्हणाल्या, “माझी तब्येत खूपच खराब झाली होती. मी प्रचंड अशक्त झाले होते आणि खूप थकल्यासारखं वाटतं होतं. माझ्या पतीला मात्र अशी स्वरुपाची लक्षणं नव्हती. सातत्याने कफ येत होता आणि खूप ताप भरत होता. हे जवळपास दोन आठवडे चालूच होतं.”

काही दिवसांनंतर सिनॅड हडसन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतरही त्यांची प्रकृती खराब होती. “अंगातील ताप कमी व्हावा म्हणून मी मी सतत पॅरासिटामॉल गोळी घ्यायचे. मात्र, गोळीचा प्रभाव कमी झाला की, ताप पुन्हा वाढायचा,” असं सिनॅड यांनी सांगितलं.

हे वाचलं का?