एग्जिट पोल

Pratap Sarnaik: ‘सरनाईकांचं ‘ते’ पत्र म्हणजे भाजपकडून सरकार अस्थिर करण्याची खेळी आहे’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर: ‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे भाजपची महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी असावी.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

जोवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोवर या सरकारला कोणीही धक्का लावू शकत नाही. असा दावा देखील यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.

‘भाजपची सरकार अस्थिर करण्याची एक खेळी’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहलं आहे ती सुद्धा भाजपची सरकार अस्थिर करण्याची एक खेळी आहे. प्रताप सरनाईक हे माझे चांगले मित्र आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दहा वर्षापूर्वी ते शिवसेनेत गेले आणि आता सध्या ते आमदार आहेत.’

‘विधानसभेत अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणल्यानंतर भाजपने केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावला.’ असं म्हणत मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

‘आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा नेते अजिबात फोडत नाही’

ADVERTISEMENT

‘जे पत्र काल प्रसिद्ध झालं त्यामध्ये त्याचा संदर्भ आहे. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एक असा आरोप केला आहे की, आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते हे फोडत आहेत. पण राज्यात अशी कुठलीही परिस्थिती नाही.’

‘कोल्हापर जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये 10 सदस्य शिवसेनेचे आहेत. काँग्रसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांचे मिळून 33 सदस्य आहे. शिवसेनेला आम्ही 3 पदाधिकारी दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 1-1 अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वाटून घेतलं.’ असं म्हणत मुश्रीफ यांनी प्रताप सरनाईक यांचा दावा खोडून काढला आहे.

Exclusive: CM ठाकरेंना दिलेल्या पत्राआधी सरनाईकांनी केलेलं मोठं वक्तव्य

‘गोकूळ दूधसंघात शिवसेनेचा प्रवेश करून घेत ६ संचालक निवडून आणले’

‘राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शिवसेनेचे नेते फोडत असल्याचा आरोप सरनाईक यांनी या पत्रात केला आहे. मात्र राज्यात अशी कोणतीही परिस्थिती नाही. राज्यातील सर्वात मोठ्या गोकूळ दूधसंघात शिवसेनेचा प्रवेश करून घेत ६ संचालक निवडून आणले.’

‘मी या गोष्टी यासाठी सांगत आहे कारण की, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत लोकांमध्ये चुकीचा मेसेज हा राज्यात जाता कामा नये.’

‘काही जिल्ह्यांमध्ये काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये दोन्ही बजूने छोट्या-मोठ्या कुरबुरी चालू आहेत. पण त्याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेचे पदाधिकारी फोडत आहे असा होत नाही.’ असं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलं आहे.

Pratap Sarnaik Letter: ‘भाजपशी जुळवून घ्या, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करत आहे’ प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब

‘मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, आमदारांनी हवी तेवढी कामं करुन घ्यावीत’

‘याउलट महाविकास आघाडी भक्कम कशी होईल. असाच प्रयत्न आमचा सुरु आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत त्यामुळे त्यांच्या आमदारांन हवी तेवढी काम करुन घ्यावीत. त्याबाबत आमची नाराजी नाही. त्यामुळे प्रताप सरनाईकांनी दिलेलं हे कारण जुजबी असावं.’ असंही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं ‘ते’ खळबळजनक पत्र जसंच्या तसं…

‘शिवसेनेचे वाघ हे बाळासाहेबांचे चेले आहेत, ते अशा धमक्यांना घाबरणारे नाही’

‘दुसरं जे त्यांनी कारण दिलं आहे ते मन अस्वस्थ करणार आहे. केंद्रीय समिती या त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देत आहेत.’

‘ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. म्हणून भाजपचं सरकार अस्थिर करण्याचे हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. शिवसेनेचे सर्व वाघ हे बाळासाहेबांचे सहकारी आणि चेले आहेत. ते अशा धमक्यांना घाबरणारे नाही.’ असं म्हणत मुश्रीफ यांनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

‘अशा कोणत्याही लेटरबॉम्बद्वारे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. आदरणीय शरद पवार साहेब, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोपर्यंत हे सरकार पाच वर्षेच काय पंचवीस वर्षे टिकेल.’ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT