मुंबै बँक : प्रविण दरेकर ‘मजूर’ नाहीत; निवडून आल्यानंतर सहकार विभागाचा दणका
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँक निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकणाऱ्या प्रविण दरेकरांना निवडणुकीनंतर लगेचच सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे. प्रविण दरेकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नासह इतर माहितीवर बोट ठेवत सहकार विभागाने ही […]
ADVERTISEMENT

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँक निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकणाऱ्या प्रविण दरेकरांना निवडणुकीनंतर लगेचच सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे. प्रविण दरेकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नासह इतर माहितीवर बोट ठेवत सहकार विभागाने ही कारवाई केली आहे.
मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच प्रविण दरेकर यांच्या मजूर असण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींकडे तक्रार केली होती. तर दुसरीकडे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं.
दरम्यान, मुंबै बँक निवडणुकीत प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले. त्याचबरोबर त्यांच्या सहकार पॅनेलचाही विजय झाला आहे. असं असतानाच प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दरेकर हे मजूर म्हणून अपात्र असल्याचा आदेश काढला आहे.
सहकार विभागाने काय म्हटलंय?