Pregnant महिलेचा जीव धोक्यात, प्रसुतीसाठी होडीतून प्रवास करत गाठलं आरोग्य केंद्र
गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला नुकतीच 39 वर्षे पूर्ण झाली. मात्र जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील गरोदर मातांचा जीव अजूनही धोक्यात आहे. 31 ऑगस्ट मंगळवार ला एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी गावकऱ्यांना त्या गरोदर मातेसह आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले. 30 ऑगस्ट च्या रात्रीपासून वेंगणुर येथील सुमित्रा नरोटे या गरोदर महिलेला […]
ADVERTISEMENT
गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला नुकतीच 39 वर्षे पूर्ण झाली. मात्र जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील गरोदर मातांचा जीव अजूनही धोक्यात आहे. 31 ऑगस्ट मंगळवार ला एका गरोदर मातेला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी गावकऱ्यांना त्या गरोदर मातेसह आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
ADVERTISEMENT
30 ऑगस्ट च्या रात्रीपासून वेंगणुर येथील सुमित्रा नरोटे या गरोदर महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या.गावात दवाखाना नसल्याने प्रसुतीसाठी 9 किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्याशिवाय पर्यायही नव्हते. मात्र, रस्त्यावर मोठे नाले आणि नाल्यात साचलेला कन्नमवार जलाशयाचा पाणी यामुळे बोटीच्या साहाय्याने रात्रीचा जलप्रवास शक्य नसल्याने त्या गरोदर मातेला रात्रभर वेदना सहन करत ताटकळत पडून राहावे लागले. पहाटे गावकऱ्यांनी कसे बसे 9 किमी प्रवास करून प्रशासनाने दिलेल्या बोटीच्या साहाय्याने कन्नमवार जलाशय ओलांडले आणि रुग्णवाहितकेतून प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. सध्या तिच्यावर रेगडी येथे उपचार सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पक्के रस्ते, नदी-नाल्यावर पूल नसल्याने तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने वेळेवर उपचाराअभावी अनेक गरोदर मातांना जीव गमवावा लागला. या महिलेला सुद्धा उपचारासाठी रात्रभर वेदना सहन करूनही पहाटे नऊ किलोमीटरचा प्रवास करून कन्नमवार जलाशय ओलांडल्याशिवाय दवाखान्यात दाखल होता आले नाही. कदाचित उपचाराअभावी या महिलेचा जीवाला सुद्धा धोका झाला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे.
हे वाचलं का?
त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रेगडी ते वेंगणूर रस्त्यावरील नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.वेंगणूर आणि बोलेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले काही गावे तब्बल पाच महिने ‘नॉट रिचेबल’ असतात.
नाल्यावर पुलाचे बांधकाम करा
ADVERTISEMENT
या भागातील नागरिकांना पावसाळ्यातील चार ते पाच महिने जीव धोक्यात टाकून जलप्रवास करावा लागत आहे त्यामुळे याठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील उपसरपंच नरेश कांदो आणि रेगडी येथील समाजसेवक प्रशांत शाहा व रवी दुधकोहरे तसेच परिसरातील नागरिकांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT