Kokan Rain : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा
कोकणात पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूणसह अनेक भागात पाऊस आणि पुराच्या स्थितीमुळे लोकांचे हाल होत आहेत. तळये या गावात दरड कोसळली आहे. 30 घरं दरडीखाली दबली आहेत. अशा सगळ्या स्थितीबाबत आणि मदत आणि बचावकार्य तसंच लोकांच्या सुरक्षिततेबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधला आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? ‘चिपळूणसह कोकणातील […]
ADVERTISEMENT
कोकणात पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूणसह अनेक भागात पाऊस आणि पुराच्या स्थितीमुळे लोकांचे हाल होत आहेत. तळये या गावात दरड कोसळली आहे. 30 घरं दरडीखाली दबली आहेत. अशा सगळ्या स्थितीबाबत आणि मदत आणि बचावकार्य तसंच लोकांच्या सुरक्षिततेबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांना सांगितले. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो.’
हे वाचलं का?
पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत?
ADVERTISEMENT
‘ सध्या ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे ते पाहता आपल्याला अतिवृष्टीची व्याख्याच बदलावी लागणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. तळीये गावाबाबतही त्यांनी भाष्य केलं. तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली होती. त्यावेळी अनेक लोकांना वाचवण्यातही आले. मात्र, आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेत ३० ते 38 लोक मृत्यूमुखी पडल्याचं कळतंय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.’
ADVERTISEMENT
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि भूस्खलनामुळे कोकणवासियांना सध्या जेरीस आणलं आहे. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत 38 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातही प्रतिक्रीया दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT