Pune Crime : पाणीपुरीवरून कडाक्याचं भांडण; बायकोने विष पिऊन केली आत्महत्या
‘मला न विचारताच पाणीपुरीचं पार्सल का आणलं?’ या कारणावरून बायकोने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. न विचारता पाणीपुरी आणल्यानं महिलेचं पतीसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर दोन दिवसांतच महिलेनं स्वतः आयुष्य संपवलं. संसारात पती-पत्नीचे कशावरून खटके उडतील याचा नेम नाही. मग अशाच छोट्या मोठ्या कुरबूरीतून कधी कधी धक्कादायक घटना घडतात. अशीच एक […]
ADVERTISEMENT
‘मला न विचारताच पाणीपुरीचं पार्सल का आणलं?’ या कारणावरून बायकोने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. न विचारता पाणीपुरी आणल्यानं महिलेचं पतीसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर दोन दिवसांतच महिलेनं स्वतः आयुष्य संपवलं.
ADVERTISEMENT
संसारात पती-पत्नीचे कशावरून खटके उडतील याचा नेम नाही. मग अशाच छोट्या मोठ्या कुरबूरीतून कधी कधी धक्कादायक घटना घडतात. अशीच एक घटना पुण्यातील आंबेगाव पठार येथे घडली आहे. प्रतीक्षा गहिनाथ सरवदे (वय 23 रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर गहिनाथ सरवदे (वय 33) असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
पुणे हादरलं! २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक#Pune #punepolice #punecrimenews #MarathiNews #crimesnews #ViolenceAgainstWomen https://t.co/uT77Z0Ysln
— Mumbai Tak (@mumbaitak) August 28, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनाथ आणि प्रतीक्षा यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांना एक मुलगा आहे. मात्र दोघांमध्ये मागील दोन वर्षाच्या कालावधीत किरकोळ कारणांवरून सातत्यानं वाद होत होते. असाच किरकोळ वाद मागील आठवड्यात दोघांमध्ये झाला. गहिनाथ सरवदे हे कामावरून येताना पाणीपुरीचे पार्सल घेऊन आले. ‘मला न विचारता पाणीपुरी का आणली’ यावरून प्रतीक्षा यांनी गहिनाथ यांच्यासोबत वाद घातला.
हे वाचलं का?
पुणे : रात्रभर टिव्ही राहिला सुरू… पत्नीचा घेतला जीव
पतीने गळा आवळून केली हत्या#Pune #punepolice #crime #crimenews #ViolenceAgainstWomen #Maharashtra #MarathiNews https://t.co/pmVCYHw6bB
— Mumbai Tak (@mumbaitak) August 30, 2021
त्यानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हते. या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षा यांनी शनिवारी विषारी द्रव्य प्राशन केलं. विष पिल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, प्रतीक्षा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथ सरवदे यांना अटक केली असून, तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT