घात केला! भावाचा अपघात झाल्याचं सांगून घेऊन गेले अन् 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाऱ्याच्या धक्कादायक घटना घडत असून, अत्याचाराची ही मालिका कायम असल्याचंच दिसत आहे. अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. भावाचा अपघात झाल्याचं सांगून पाच आरोपी महिलेला घेऊन गेले आणि सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

ADVERTISEMENT

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील खोर गावाच्या परिसरात ही घटना घडली आहे. नराधम पीडित महिलेल्या निर्जनस्थळी घेऊन गेले आणि आरोपींनी शनिवारी (29 जानेवारी) रात्री 8.30 ते 11.00 वाजेच्या दरम्यान सामूहिक बलात्कार केला. खोटं बोलून अत्याचार करणाऱ्या पाच आरोपींना यवत पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली.

माझ्या नादी लागाल तर करेन ३०२; इन्स्टाग्रामवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, ‘थेरगाव क्विन’ अटकेत

हे वाचलं का?

महिलेसोबत काय घडलं?

पीडित महिला रस्त्यावर उभी होती. यावेळी आलेल्या आरोपींनी महिलेला ‘तुझ्या भावाचा अपघात झाला आहे’, असं सांगितलं. त्यानंतर आरोपी पीडित महिलेला दुचाकीवर बसवून तीन किलोमीटर अंतरावर घेऊन गेले. आरोपींनी महिलेला एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला.

ADVERTISEMENT

पोलिसांचा मुळशी पॅटर्न ! दहशत माजवणाऱ्या आरोपींचं मुंडन करुन काढली धिंड

ADVERTISEMENT

आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित महिलेनं यवत पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत तातडीनं पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणामुळे दौंडमध्ये खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT