पुणे: जेलरच्या मुलाची निर्घृण हत्या, तरुणीने केले कोयत्याने सपासप वार
पुणे: पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरवरील मैदानात अमरावती मध्यवर्ती कारागृहातील जेलरच्या मुलाचा एक तरुणी आणि चार पुरुषांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड (वय 21 वर्ष) असे मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पाच अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
ADVERTISEMENT
पुणे: पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरवरील मैदानात अमरावती मध्यवर्ती कारागृहातील जेलरच्या मुलाचा एक तरुणी आणि चार पुरुषांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
गिरीधर गायकवाड (वय 21 वर्ष) असे मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पाच अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल कुमार गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार गिरीधर गायकवाड या मयत तरुणाच्या मोबाइलवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फोन आला. त्यावेळी घरातून बाहेर पडताना, कोणाचा फोन आहे. कुठे चाललास? असे भावाने विचारले. त्यावर आलोच म्हणून उत्तर दिले आणि तो निघून गेला.
गिरीधर बराच वेळ झाला तरी घरी आला नाही. म्हणून निखिल कुमार याने फोन लावला. तेव्हा एकदा रिंग वाजली आणि काही वेळाने फोन नॉट रिचेबल आला. त्यानंतर अगदी काही मिनिटांनी वडिलांचा आम्हाला फोन आला. ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे सांगितले. त्यावर आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गिरीधर याचा मृतदेह असल्याची ओळख पटली. तर त्याचवेळी तिथे असलेले एक प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चार पुरुष आणि तरुणी यांनी गिरीधर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
हे वाचलं का?
Aurangabad : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरूणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या
गिरीधरची हत्या करुन हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
दरम्यान, अमरावतीतील जेलरच्या मुलाची पुण्यात हत्या का करण्यात आली? या हत्येमागचं नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच फरार आरोपींना शोधून काढण्याचं देखील मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT
पुणे: 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून बाप-लेकाची हत्या, कोयत्याने केले वार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील लोणीकंद परिसरात 5 ते 6 जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. काही तरुण हे 22 वर्षीय तरुणाला कोयता आणि बेसबॉलने मारहाण करीत होते. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडीलांना देखील त्या टोळक्याने मारहाण केली. या घटनेमध्ये दोघा बापलेकाची हत्या झाल्याची घटना घडली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT