Pune School : पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून उघडणार; पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली असतानाच सरकारने सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यातही शाळा बंद आहेत. मात्र, १ फेब्रुवारीपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली असतानाच सरकारने सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यातही शाळा बंद आहेत. मात्र, १ फेब्रुवारीपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक फेब्रुवारीपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. यात पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू केले जाणार आहेत, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहेत.
महाराष्ट्र खरंच ‘मास्क मुक्त’ होणार आहे का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर
हे वाचलं का?
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालं असल्यानं कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचं पालन करून १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचा आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांचा
ADVERTISEMENT
दरम्यान, १ फेब्रुवारीपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरु होत असल्या, तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबद्दल तूर्तास सक्ती करू नये, असे निर्देश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. १ फेब्रुवारीपासून महाविद्यालयेही सुरू होत आहे, पण लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जावा, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी सूचना अजित पवारांनी यावेळी केली.
ADVERTISEMENT
Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात १०३ रुग्णांचा मृत्यू; पुण्यात आढळले सर्वाधिक रुग्ण
‘लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्यानं लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण चांगलं आहे तर शहरी भागात कमी आहे. ग्रामीण भागातील शाळांमधून लसीकरणाची सुविधा दिल्यानं हे प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी’, असं अजित पवारांनी बैठकीत सांगितलं.
‘लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संस्था चालकांनी शाळेत कोविड नियमांचं पालन करून आणि पात्र विद्यार्थ्यांचं १०० टक्के लसीकरण होईल, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी शाळेत देखील मास्कचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे. अद्यापही कोविडचे संकट असल्यानं नागरिकांनी मास्क वापरणं आणि मार्गदर्शक सुचनांचं पालन करणं आवश्यकच आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी’, अशा सूचनाही अजित पवारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT