Queen Elizabeth Death: ब्रिटनमध्ये दहा दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, स्कॉटलँडची संसद स्थगित
Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉय फॅमिलीने दिलेल्या माहिती नुसार महााणी एलिझाबेथ या मागील काही काळापासून episodic mobility या आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना उभं राहण्यात आणि चालण्यात अडचणी येत होत्या. महाराणी एलिझाबेथ यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाही झाला […]
ADVERTISEMENT

Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉय फॅमिलीने दिलेल्या माहिती नुसार महााणी एलिझाबेथ या मागील काही काळापासून episodic mobility या आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना उभं राहण्यात आणि चालण्यात अडचणी येत होत्या. महाराणी एलिझाबेथ यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाही झाला होता. एलिझाबेथ यांची प्रकृती गुरूवारी सकाळी बिघडली. तेव्हापासून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होत्या.
राणी एलिझाबेथ यांची ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द थोडी-थोडकी नाही तर तब्बल ७० वर्षांची ठरली. या कालावधीत त्यांनी ब्रिटनचे १५ पंतप्रधान पाहिले. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग झाले आहेत. एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या नाही तर १४ आणखी देशांच्या महाराणी होत्या. हेच पद आता किंग चार्ल्स यांच्याकडे आलं आहे.
प्रिन्स फिलिप यांच्यासोबत एलिझाबेथ यांचा विवाह
१९३९ मध्ये जेव्हा एलिझाबेथ १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या आपल्या वडिलांसोबत आणि आईसोबत डार्टमथ येथील रॉयल नेव्हल कॉलेमध्ये जाऊ लागल्या. तिथे त्यांची भेट ग्रीसचे प्रिन्स फिलिप यांच्यासोबत झाली. ही त्यांची पहिली भेट नव्हती. मात्र जेव्हा नेव्हल कॉलेजमध्ये हे दोघं भेटले तेव्हा एलिझाबेथ यांना प्रिन्स फिलिप आवडू लागले. सुट्टी असताना प्रिन्स फिलिपही आपल्या राजघराण्यातील नातेवाईकांना भेटण्यासाठी लंडनमध्ये पोहचले. १९४४ वर्ष संपत असताना एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या प्रेमकहाणीने आकार घेतला होता. ते दोघेही एकमेकांना चिठ्ठी पाठवत असत. एलिझाबेथ या त्यांच्या खोलीत प्रिन्स फिलिप यांचे फोटोही ठेवू लागल्या होत्या.
दुसरं महायुद्ध संपल्यानंतर एलिझाबेथ या प्रिन्स फिलिप यांच्याशी विवाह करू इच्छित होत्या. मात्र त्यांच्या मार्गात काही अडथळे होते. एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज हे आपल्या मुलीला दूर करू इच्छित नव्हते. तर प्रिन्स फिलीप हे दुसऱ्या देशाचे होते हे देखील लग्नाला आक्षेप घेण्याचं कारण होतं. मात्र या सगळ्या अडचणी दूर झाल्या. २० नोव्हेंबर १९४७ ला लंडनच्या शाही चर्चमध्ये हे दोघं विवाहबद्ध झाले.