पाठीत खंजीर खुपसून वेगळा पक्ष काढला, हे विसरलात का?; सुप्रिया सुळेंना विखे पाटलांचा सवाल
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्यानंतर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यात उडी घेतली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांना उपरोधिक टोला लगावला होता. सुजय विखे यांच्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांनीही उत्तर दिलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले? “खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्व इतिहास […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्यानंतर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यात उडी घेतली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांना उपरोधिक टोला लगावला होता. सुजय विखे यांच्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांनीही उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
“खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा. राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या विक्रीबाबत त्यांनी बोलले पाहिजे”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
खा. @supriya_sule यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा…
राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? 1/2— R Vikhe Patil (@RVikhePatil) February 8, 2022
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याबद्दल विखे पाटील काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड संकटात वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाचा आधार राज्याला आणि देशाला मिळाला. आघाडी सरकार तर फक्त फेसबुकवर होते! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण महाराष्ट्राच्या विरोधात नाही. विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न”, असं भाष्य विखे-पाटील यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
प्रधानमंत्री मा. @PMOIndia यांनी कोव्हिड संकटात वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाचा आधार राज्याला आणि देशाला मिळाला.
आघाडी सरकार तर फक्त फेसबुकवर होते!प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांचे भाषण महाराष्ट्राच्या विरोधात नाही. विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न! 1/2
— R Vikhe Patil (@RVikhePatil) February 8, 2022
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
ADVERTISEMENT
लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “यूपीए एक आणि यूपीए दोन विषयी सुजय विखे पाटील खूप काही बोलले. बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. मी फक्त त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की, यूपीए एक आणि दोन मधील सरकारमध्ये त्यांचे वडील मंत्री होते. त्यामुळे सर्व धोरणं निश्चित झाली तेव्हा ते काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे त्यांनी जी काही टीका केलीये, ती आपल्याच वडिलांविरोधात केली आहे. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. मराठीत म्हणतात खाल्ल्या मिठाला जागा. कधीही कुणाचंही अगदी २ रुपयांचं जरी खाल्लं असेल, तर त्याला नेहमीच लक्षात ठेवा ही माझी संस्कृती आहे, हे मला माझ्या आईने शिकवलं आहे”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.
सुजय विखे पाटील काय म्हणाले होते?
सुप्रिया सुळेंना सुजय विखे-पाटील यांनी राहता येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना उत्तर दिलं होतं. “आम्ही खाल्ल्या मिठाला जागावं की नाही, हे जे कधीच कुणाच्या मिठाला जागले नाहीत त्यांनी शिकवू नये. राधाकृष्ण विखे पाटील किंवा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे कोणत्या पक्षाच्या जिवावर नव्हे, तर गोरगरीब जनतेच्या मतांमुळे राजकारणात टिकून आहेत,” असं विखे पाटील म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT