खळबळजनक घटना : बीड जिल्ह्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशन मास्तरचा मृत्यू
बीड जिल्ह्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानकात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन मास्तर मुसाफिर सिंग (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्या केबिनमध्ये आढळून आला. सिंग यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मुसाफिर सिंग हे बिहारचे रहिवासी होते. पानगाव (जिल्हा लातूर) येथे पहाटे साडेचार वाजता रेल्वे गाडी […]
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानकात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन मास्तर मुसाफिर सिंग (वय ५१) यांचा मृतदेह त्यांच्या केबिनमध्ये आढळून आला. सिंग यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
ADVERTISEMENT
मुसाफिर सिंग हे बिहारचे रहिवासी होते. पानगाव (जिल्हा लातूर) येथे पहाटे साडेचार वाजता रेल्वे गाडी आली असता त्याला सिग्नल मिळत नव्हता. पंधरा मिनीटं उलटून गेल्यानंतरही सिग्नल न मिळाल्यामुळे त्याने पानगावमधील एका व्यक्तीला घाटनांदूर येथे पाठवलं असता केबिनमध्ये मुसाफिर सिंग यांचा मृतदेह आढळून आला.
हे वाचलं का?
प्राथमिक तपासावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सव्वा दोन वाजल्याच्या दरम्यान एक मालवाहतूक गाडी गेल्यानंतर मुसाफिर सिंग यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय. या घटनेनंतर या रेल्वे मार्गावरची वाहतूक १५ मिनीटं ठप्प झाली होती. मुसाफिर सिंग हे अविवाहीत आहेत. त्यांना मदत मिळवण्यासाठी पॉईंट्समन उपलब्ध नसल्याची माहिती समोर येते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT