रजनीकांतना काहीच अशक्य नाही…: राज ठाकरे

मुंबई तक

मुंबई: सिनेसृष्टीत गेली अनेक दशकं आपली छाप सोडणारे सुपरस्टार रजनीकांत यांना आज (1 एप्रिल) मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रजीनकांत यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: सिनेसृष्टीत गेली अनेक दशकं आपली छाप सोडणारे सुपरस्टार रजनीकांत यांना आज (1 एप्रिल) मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रजीनकांत यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी रजनीकांत यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

‘रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या ह्या अभिनेत्यांच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.’ या शब्दात राज ठाकरेंनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?