Raj Thackeray Pune: अयोध्या दौरा ते मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका, पाहा राज ठाकरेंचं भाषण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेत असून मनसैनिकांशी ते संवाद साधत आहेत. यावेळी ते प्रामुख्याने आपला अयोध्या दौरा, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा यासारख्या मुद्द्यांवर बोलणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • तूर्तास आपलं जे आंदोलन सुरु आहे ते सुरुच ठेवा. लवकरच मी मनसैनिकांना एक पत्र देईल. ते घरोघरी पोहचलं पाहिजे आपली भूमिका लोकांना समजली पाहिजे.

हे वाचलं का?

  • माझी शस्त्रक्रिया झाली की, जरा तीन-चार आठवडे रिकव्हरीमध्ये जातील. पण त्यानंतर १-२ महिन्यात मी पुन्हा तुमच्यासमोर येईल.

  • आमचे संदीप देशपांडे जवळजवळ पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आल्यासारखे चौकशी करत होते.

  • ADVERTISEMENT

  • जे कायदा पाळत नाही त्यांच्याशी तुम्ही मात्र चर्चा करत आहात.

  • ADVERTISEMENT

  • जो कायदा पाळा सांगतोय त्याला अटक, तडीपार, नोटीस पाठवतात.

  • मी सांगतोय.. भोंग्यांचं आंदोलन हे एक दिवसांचं नाही. ते तुम्हाला तपासून पाहत आहेत. विसरतात की, काय.. त्यामुळे आता जे काही सुरु केलं आहे ना.. त्याचा तुकडा पाडूनच टाका.

  • आवाज कमी नको, थेट भोंगेच खाली उतरवा

  • मनसेमुळे इतिहासात पहिल्यांदा सकाळची अजान बंद झाली

  • शिवसेनेनं स्वत:च्या राजकारणासाठी MIM ला मोठं केलं.

  • माझी केंद्र सरकारला विनंती आहे लवकरच औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करा आणि यांचं राजकारणच मोडीत काढा.

  • परवा दिवशी म्हणाले.. संभाजीनगर नामांतर झालं काय किंवा नाही झालं काय.. मी बोलतोय ना… अरे तू आहेस कोण? तू काय वल्लभभाई पटेल आहेस की गांधीजी आहे?

  • उद्धव ठाकरेंनी मला सांगावं की, तुमच्यावर आंदोलन केल्याची एक तरी केल आहे का?

  • महाराष्ट्र भरती होती तर इथल्या मुलांनाच नोकऱ्या मिळायला हवं.

  • पण सगळ्यात महत्त्वाचं भरती महाराष्ट्रात आणि जाहिराती बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पेपरमध्ये येत होत्या.

  • रेल्वेचं आंदोलन झालं होतं. त्यावेळी आपल्या मुलांना एका परप्रांतियाने आईवरुन शिवी दिली आणि तिकडून सगळं सुरु झालं होतं.

  • हिंदुत्व वॉशिंग पावडर झाली आहे. कोण किती शुभ्र याची स्पर्धा सुरु आहे

  • मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्या दिवशी.. साला काय पोरकटपणा आहे.

  • राणा दाम्पत्याचा सगळा राडा आपण दोन दिवस सलग पाहिलं. पण हेच राणा दाम्पत्य लडाखमध्ये राऊतांसोबत जेवताना दिसले.

  • मी सांगितलं की, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा पण त्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला निघाले. अरे मातोश्री काय मशिद आहे का?

  • यांना आताच कशीच जाग आली? एकमेकांविरुद्ध नेहमी भांडतात. पण आपल्या वेळेस कसे सगळे बरोबर एकत्र येतात.

  • तुम्हाला आता जाग आली का? १३-१४ वर्षानंतर.. माफी मागण्याबाबत

  • हा सगळा सापळा होता. मला सापळ्यात अडकून आपली ही पोरं, ही ताकद गमवायची नव्हती.

  • एक खासदार तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान कसं देऊ शकतो?

  • समजा, तिकडे चुकून काय झालं असतं तर तिकडे आपली पोरं गप्प बसली नसती. मग तुमच्या पोरांवर केसेस टाकलं असतं. तुम्हाला जेलमध्ये सडवलं असतं. म्हणून मी दौरा स्थगित केलं.

  • पण ज्या प्रकारे तिकडे वातावरण तापवलं जात आहे. समजा मी तिथे हट्टाने गेलो असतो. तिथे हजारो मनसैनिक आले असते.

  • मला राज जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतंच, पण जिथे कारसेवक मारले गेले त्या जागेचंही दर्शन घेतलं असतं

  • दोन दिवसापूर्वी मी चार ओळी टाकल्या आणि लगेच चर्चा सुरु झाली.

  • 1 तारखेला माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

  • मागील काही दिवसांपासून माझ्या पायाचं दुखणं वाढलं आहे.

  • तसं आता काही निवडणूक वैगरे नाही मग कशाला पावसात भिजायचं.

  • तसंच हवामान असं आहे की, पाऊस कधीही येऊ शकतो. मुंबईत काल पाऊस झाला पुण्यात पाऊस आज होण्याची शक्यता आहे.

  • आम्हाला मैदान नाकारलं मग आता कोणालाच नाही

  • पाहा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT