राज ठाकरे यांची 50 हून अधिक कलाकारांशी चर्चा; अडचणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे परिस्थिती कठीण झाली आहे. शूटींगवर बंदी आणल्यामुळे कलाकार तसंच बॅकस्टेज आर्टिस्टना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी नाटक, सिनेमा, संगीत तसंच मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी व्हिडीयो कॉलद्वारे संवाद साधला.

ADVERTISEMENT

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत दिग्दर्शक सतीश राजवाडे, महेश कोठारे, महेश मांजरेकर, केदार शिंदे, अभिनेते प्रशांत दामले, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक तसंच कौशल इनामदार यांनी सहभाग घेतला होता. सध्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत मराठी सिनेसृष्टीसमोर कोणत्या अडचणी आहेत याचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला. चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला.

हे वाचलं का?

राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. एक पडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली.

ADVERTISEMENT

सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत राज यांनी तयारी दर्शवली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT