Raj Thackeray यांची पुन्हा एकदा पुणे-नाशिकवर नजर, आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी

मुंबई तक

पुणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) तयारीसाठी सक्रिय झाले आहेत. 28 जुलैपासून राज ठाकरे हे पुण्यात (Pune) तीन दिवस मुक्कामी असून यामध्ये शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून मनसेच्या शहर कार्यालयात या बैठकांना सुरुवात झाली आहे. कसबा, पर्वती, हडपसर या तीन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पुणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) तयारीसाठी सक्रिय झाले आहेत. 28 जुलैपासून राज ठाकरे हे पुण्यात (Pune) तीन दिवस मुक्कामी असून यामध्ये शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून मनसेच्या शहर कार्यालयात या बैठकांना सुरुवात झाली आहे. कसबा, पर्वती, हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु केली असून ते इच्छुक शाखा अध्यक्षांच्या मुलाखती देखील घेणार आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे सक्रीय झाले आहे असंच सध्या तरी दिसतं आहे.

मागील काही काळापासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अशावेळी आता येत्या काही महिन्यांमध्ये पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता दाट आहे. त्याच दृष्टीने मनसेने आतापासून निवडणुकांची तयारी सुरु केली असून नाशिक पाठोपाठ त्यांनी पुण्याचा देखील दौरा केला आहे.

मागील काही निवडणुकांमध्ये मनसेला सपाटून मार खावा लागला आहे. अशावेळी आतापासूनच नवी रणनिती तयार करुन आगामी निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळविण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यासाठी खुद्द राज ठाकरे हे रिंगणात उतरले आहेत. आगमी निवडणुका लक्षात घेऊन राज ठाकरे यांचा नाशिक आणि पुण्यातील दौरा हा पक्षासाठी महत्त्वाचा ठरु शकतो.

हे वाचलं का?