Rajan Salvi : ठाकरेंच्या आमदाराभोवती एसीबी चौकशीचा फास आवळला
–राजेश गुडेकर, रत्नागिरी वैभव नाईकांपाठोपाठ शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग) रडार आले आहेत. राजन साळवी रायगड एसीबीच्या चौकशीमुळे चर्चेत असून, त्यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जात असल्याचं दिसत आहे. कारण आता एसीबीने जिल्हाधिका इतकंच नाही, तर ठाकरे गटातील विधानसभेच्या संभाव्य उमेदवारालाही नोटीस आल्यानं वेगवेगळ्या […]
ADVERTISEMENT

–राजेश गुडेकर, रत्नागिरी
वैभव नाईकांपाठोपाठ शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आणि आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग) रडार आले आहेत. राजन साळवी रायगड एसीबीच्या चौकशीमुळे चर्चेत असून, त्यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जात असल्याचं दिसत आहे. कारण आता एसीबीने जिल्हाधिका इतकंच नाही, तर ठाकरे गटातील विधानसभेच्या संभाव्य उमेदवारालाही नोटीस आल्यानं वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
रायगड एसीबीकडून राजन साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. याबाबत राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांची देखील चौकशी झाली. दरम्यान, राजन साळवी यांनी आमदार झाल्यापासून म्हणजेच 2009 पासून आमदार निधीतून आतापर्यंत खर्च केलेल्या निधीची आणि कामांची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडे रायगड एसीबीनं मागविली आहे. तसेच कार्यालयात जाऊन चौकशी केली असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
“माझ्या चौकशीत तुम्हाला काहीही सापडणार नाही, पण तुम्हाला मला अडकवायचं असेल, तर जरूर अडकवा. माझ्यावर गुन्हा दाखल करा. मला अटक करा, जेलमध्ये पाठवा. मी कोणत्याही धमकीला घाबरत नाही. पण माझ्यामुळे शासकीय यंत्रणा आणि इतर कोणाला त्रास देऊ नका”, असा इशारा राजन साळवी यांनी दिला आहे.










