Rajya Sabha By-Poll : Rajeev Satav यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभा पोटनिवडुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. राजीव सातव यांची महाराष्ट्रातून रिक्त झालेली एक जागा आणि याव्यतिरीक्त पाच खासदारांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागांवरही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सहा जागांपैकी तामिळनाडूत दोन तर महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यात प्रत्येकी १ जागेवर निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम –

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) नामांकन जाहीर करणे – १५ सप्टेंबर २०२१

२) नामांकन जाहीर करण्याची अखेरची तारीख – २२ सप्टेंबर २०२१

ADVERTISEMENT

३) आलेल्या नामांकनांची पडताळणी – २३ सप्टेंबर २०२१

ADVERTISEMENT

४) अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२१

५) निवडणुकीची तारीख – ४ ऑक्टोबर

६) मतदानाची वेळ – सकाळी ९ ते संध्याकाळी ४

७) मतमोजणी – ४ ऑक्टोबर, संध्याकाळी ५ वाजल्यानंतर

राजीव सातव हे काँग्रेसच्या युवा नेत्यांपैकी एक मानले जायचे. राहुल गांधीच्या जवळच्या गोटातले नेते म्हणून राजीव सातव यांची ओळख होती. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव मोदीलाटेतही हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते. परंतू २०१९ साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. राज्यसभेत खासदारकी मिळाल्यानंतर मध्यंतरी कोरोनामुळे त्यांची तब्येत खालावली होती. ज्यानंतर पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत होते. परंतू या उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही अखेरीस १६ मे २०२१ रोजी त्यांचं निधन झालं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT