आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! पाहुण्यांची यादी झाली ‘लीक’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच सात फेरे घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही एप्रिलमध्येच लग्न करणार आहे. नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार प्री-वेडिंग आणि लग्नासाठी १३ ते १७ एप्रिलपर्यंतच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच आलिया-रणबीरच्या लग्नाला उपस्थित असणाऱ्या सेलिब्रेटी आणि पाहुण्यांची नावंही समोर आली आहेत.

ADVERTISEMENT

गेल्या काही महिन्यांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होती. मागील काही वर्षांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये असून, अलिकडेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्याने लग्नाची तारीख सांगण्याचं टाळलं होतं.

आलिया भट्टसोबत लग्न कधी करणार?; रणबीर कपूर म्हणाला, ‘मला पिसाळलेलं कुत्रं चावलंय का?’

हे वाचलं का?

आता आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याची माहिती आहे. दोघं लवकरच विवाहबद्ध होणार असून १३ ते १७ एप्रिल दरम्यान प्री-वेडिंग आणि लग्नाचा सोहळा चालणार असल्याचं समजते. लग्नाची तयारी सुरू असून, आता दोघांच्या लग्नाला कोण कोण असणार याची यादी लीक झाली आहे.

आलिया-रणबीरचा विवाह राजेशाही थाटात होणार असून, या विवाह समारंभाला मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, करण जोहर, झोया अख्तर, डिझायनर मसाबा गुप्ता, अभिनेता वरूण धवन आणि त्याचा भाऊ रोहित धवन उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीही या सोहळ्याला हजर असणार आहे.

ADVERTISEMENT

या नावांबरोबरच आलिया आणि रणबीरच्या जवळचे असलेले अर्जून कपूर, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि अनुष्का रंजन यांच्याही नावांचा पाहुण्यांच्या यादीत समावेश असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया भट्टने डिअर जिंदगी चित्रपटात सहकलाकाराच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानलाही निमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर आलिया आणि रणबीरचे जवळचे मित्र या विवाह सोहळ्याला हजर असणार आहे. दोघांच्या कुटुंबातील सदस्य, यात नीतू कपूर, रिद्धीमा कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि सोनी राजदान हे सोहळ्यात असणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आलिया आणि रणबीर कपूरचा यांचा विवाह सोहळा मुंबईतच होणार आहे. मुंबईतील चेंबूर येथे असलेल्या आर.के. हाऊसमध्ये सोहळा असणार आहे. यापूर्वी आलेल्या वृत्तांमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राजस्थानातील उदयपूर येथे विवाह करणार असल्याचं म्हटलं गेलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT