Maharashtra Rain : कोकणात पावसाचं धुमशान ! रायगडमध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुरुड आणि रोहा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अलिबागवरुन मुरुडकडे जाणाऱ्या मार्गावर बोर्ली भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा भाग संपूर्णपणे जलमय झाला आहे. मुरुड तालुक्यात यंदा रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत ३४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती स्थानिक तहसील कार्यालयाने दिली.

ADVERTISEMENT

मुरुड आणि रोहा तालुक्यातले अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. भारतीय हवामान विभागाने १५ जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये, दुकानांत शिरल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. रात्रीपासूनच रायगड जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटींग सुरु होती. सकाळी थोडा काळ पावसाने उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा सरी कोसळायला सुरुवात झाल्यामुळे मुरुडकरांचं जीवन विस्कळीत झालं आहे.

हे वाचलं का?

मुरुड सोबतच रोहा तालुक्यातही पावसाची संततधार कायम आहे. कुंडलिका नदीपात्रात वाढ झाली असून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. रायगड जिल्ह्याला IMD ने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. दरम्यान अलिबागमध्ये काल रात्री काशिद भागात नाल्यावरचा पूल खचून एकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. एक कार आणि बाईक या पुलावरुन जात असताना अडकली गेली. स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. परंतू बाईकस्वाराचा यात मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT