Reels Addiction : झोपण्यापूर्वी तासंतास रील्स पाहत असाल, तर आजारी पडाल... वाचा काय काय होतात परिणाम

मुंबई तक

सतत रील्स पाहत असलेल्या लोकांसाठी हे व्यसन बनलं असून, हे व्यसन मोठ्याप्रमाणात धोकादायक ठरताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत सतत रील्स पाहणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के लोकांना निद्रानाश आणि त्यापेक्षाही गंभीर आजार जडले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री उशिरा तासंतास रील्स पाहताय?

point

झोपण्यापूर्वी रील्स पाहत बसणं ठरेल धोक्याचं

सोशल मिडिया वापरणाऱ्या प्रत्येकालाच आजकाल रील्स पाहण्याचं व्यसन लागलं असून, अनेकजण तासंतास रील्स बघत असतात. मात्र, हे व्यसन मोठ्याप्रमाणात धोकादायक ठरताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत सतत रील्स पाहणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के लोक निद्रानाश, डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. तसंच यामुळे उच्च रक्तदाबासारखे गंभीर आजारही जडू शकतात असं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये 4,318 तरूणआणि मध्यमवयीन लोकांच्या तपसण्या करण्यात आल्या होत्या. याबद्दलचा लेख बीएमसी जनरलमध्ये प्रसिद्ध केल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे. त्यानुसार, रात्री झोपण्यापूर्वी जे लोक तासंतास रील्स पाहतात त्यांना ब्लड प्रेशरसारखे गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> Nylon Manja Deaths : मांजा गळ्यात अडकला, थेट श्वासनलिका कापली गेली; राज्यात तिघांचा मृत्यू, 2 गंभीर

भारतात झालेल्या दुसऱ्या एका अभ्यासात एका अभ्यासात 150 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. या सहा महिन्यांच्या अभ्यासात, 10 वर्षांच्या किशोरवयीन मुलांपासून ते 55 वर्षांच्या मानसिक आजारी रुग्णांपर्यंतचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 30 महिलाही होत्या.

यापैकी बहुतेक रुग्णांनी दीड वर्षांहून अधिक काळ रोज रात्री रील पाहत असल्याचे कबूल केलं आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मी सोशल साइट्सवर रील्स पाहतो असं मोठ्या संख्येने लोकांनी सांगितलं. त्यांनी रोज अर्धा ते एक तास सतत रील पाहिले असं ते म्हणाले. विशेष म्हणजे या रुग्णांनी स्वत:चे रील्स बनवले नाही, तर फक्त इतरांचे व्हिडिओ किंवा रील सोशल साइट्सवर पाहिले.

कोणकोणत्या समस्या?

हे ही वाचा >>Nylon Manja Deaths : मांजा गळ्यात अडकला, थेट श्वासनलिका कापली गेली; राज्यात तिघांचा मृत्यू, 2 गंभीर

- डोकेदुखी,डोळ्यात वेदना
- झोपताना डोळ्यांत चमक जाणवणे
- जेवण आणि पेयांच्या वेळा बिघडत आहेत.

उपाय काय?

- हळूहळू व्यसन सोडा.
- गरज असेल तेव्हाच मोबाईल फोन वापरा
- तुमची आवडती पुस्तके वाचा
- मित्रांना भेटा
- लोकांशी संवाद साधत राहा.



 

हे वाचलं का?

    follow whatsapp