कोल्हापूरमधले निर्बंध सोमवारपासून 8 दिवस हटवले, सगळी दुकानं सुरू होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आठ दिवसासाठी कोल्हापूर शहरातले निर्बंध हटवले आहेत. सोमवार म्हणजेच 5 जुलैपासून अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी सोमवार 5 जुलै ते शुक्रवार 9 जुलै या कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी 4 या वेळासाठी देण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आठ दिवसासाठी कोल्हापूर शहरातले निर्बंध हटवले आहेत. सोमवार म्हणजेच 5 जुलैपासून अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.
ADVERTISEMENT
ही परवानगी सोमवार 5 जुलै ते शुक्रवार 9 जुलै या कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी 4 या वेळासाठी देण्यात आली आहे. आठ दिवसानंतर पुन्हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये,सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे .
पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्ण संख्या या बाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला दिलेले पत्र आणि जनभावनेचा विचार करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध आठ दिवसासाठी हटवले आहेत. असे असले तरी सर्व काही सुरू झाले आहे, असे समजून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. तसेच विनाकारण गर्दी करू नये . यामुळे जर रुग्णसंख्या वाढली तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल. आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये याचा सुद्धा विचार सर्वांनी करावा. त्यामुळे सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊनच कोल्हापूर शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत ,अशी विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.
हे वाचलं का?
सध्या कोरोनाचं संकट काहीसं ओसरताना दिसत असलं तरीही आणि राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना दिसत असलं तरीही तिसऱ्या लाटेची चर्चा होते आहे. तसंच कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोकाही जाणवतो आहे. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. आता कोल्हापूरमधले निर्बंध आठ दिवसांसाठी हटवले जाणार आहेत असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र कुणीही सगळं सुरू झालं आहे असं समजून गर्दी करू नये. आठ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. आठ दिवसांमध्ये कोरोनाची परिस्थिती बिघडली तर पुन्हा निर्बंध लादावे लागतील असंही स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT