मालिकांचे जुने दिवस परतणार ? रामायण-महाभारतानंतर या मालिका करतील मनोरंजन
कोरोना व्हायरसमुळे फिल्म इंटस्ट्रीवर वाईट परिणाम पडण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा तसंच मालिकांच्या शूटींगवरही परिणाम होताना दिसतोय. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला होता त्यावेळी शूटींग थांबल्यामुळे टीव्हीवर जुन्या मालिका टेलिकास्ट करण्यात आल्या होत्या. त्यावेळी रामायण आणि महाभारत या मालिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा जुन्या मालिका सुरु होणार अशा […]
ADVERTISEMENT
कोरोना व्हायरसमुळे फिल्म इंटस्ट्रीवर वाईट परिणाम पडण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा तसंच मालिकांच्या शूटींगवरही परिणाम होताना दिसतोय. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला होता त्यावेळी शूटींग थांबल्यामुळे टीव्हीवर जुन्या मालिका टेलिकास्ट करण्यात आल्या होत्या. त्यावेळी रामायण आणि महाभारत या मालिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा जुन्या मालिका सुरु होणार अशा चर्चा आहेत. तर पाहुयात असे आयकॉनिक शो जे जुन्या दिवसांची आठवण करून देऊ शकतात.
ADVERTISEMENT
तारा
हे वाचलं का?
तारा झी टीव्हीवर प्रसारित करणारी पहिली भारतीय मालिका होती. या कार्यक्रमात तीन शहरी महिलांचं जीवन, संघर्ष तसंच आकांक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
देख भाई देख
ADVERTISEMENT
अजूनही देख भाई देख ही मालिका लोकांच्या मनात आहे. या मालिकेत 3 जनरेशनची कहाणी उलगडण्यात आली होती.
चंद्रकांता
मालिकांमध्ये काल्पनिक कार्यक्रमात चंद्रकांता ही खूप लोकप्रिय होती. क्रुर सिंह ते रूपमतीपर्यंतची सर्व पात्रं प्रसिद्ध झाली होती. या शोमध्ये लव्ह स्टोरीदेखील दाखवण्यात आलेली
ब्योमकेश बक्शी
ब्योमकेश बक्शी ही एक भारतीय-बंगाली कल्पित डिटेक्टिव्ह शो होता. बक्शी आपली बुद्धिमत्ता, फॉरेंसिक सायन्स, लॉजिस्टिक्स आणि ऑब्जर्वेशनद्वारे खुनामागील रहस्य उलगडण्यासाठी प्रसिध्द होता.
बनेगी अपनी बात
या शोमध्ये अर्बन कॉलेजचे रोमान्स आणि त्यानंतरचा हार्ट ब्रेक दाखवण्यात आला होता. शोमध्ये युथफुल लाईफ कशी असते हे समजवण्यात आलेलं.
वागले की दुनिया
वागळे की दुनिया 1988 मध्ये प्रसारित झाली होती. या शोमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी सांगण्यात आलेली. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सुद्धा दिसला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT