चक्क रिक्षा चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड, ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: बाइकवरुन प्रवास करताना जर आपण हेल्मेट घातलं नाही तर आपल्याला नक्कीच दंड ठोठावला जातो. पण कल्याण शहरात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला चक्क रिक्षा चालवताना हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकाराला आहे.वाहतूक पोलिसांची ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते. त्याचे ताजं उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे.

ADVERTISEMENT

मुंबईच्या कांदिवली भागात 3 डिसेंबर 2021 रोजी एक दुचाकी चालक विनाहेल्मेट प्रवास करत होता. त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याला दंडही ठोठावण्यात आला. मात्र आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाइन प्रणालीच्या ई-चलानद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे.

सुरुवातीला मोबाइलवर या दंडा संबंधी माहिती आल्यानंतर रिक्षा चालक गुरुनाथला धक्काच बसला. त्याने या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माझी चूक नसताना मी ठाणे येथे का जावे? वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी अशी मागणी गुरुनाथ यांनी केली आहे.

हे वाचलं का?

या सगळया प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालकाने केली आहे. तर वाहतूक पोलिसांनी आपल्या ई-चलान पध्दतीत काम करताना निदान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यालाच दंड आकारला जातो आहे का? याची माहिती नीट तपासून संबंधीताचा मोबाइलवर दंड पाठवावा अन्यथा अनेकांना या ई-चलान प्रणालीचा नाहक त्रास होणार असल्याचे प्रतिक्रिया रिक्षा चालकाचे नातेवाईक मदन चिकणकर यांनी दिली आहे.

ट्रॅफिक हवालदार कारच्या बोनेटवर बसले असतानाही पळवली गाडी, मुंबईच्या अंधेरी भागातली धक्कादायक घटना

ADVERTISEMENT

दरम्यान, आता या प्रकरणी वाहतूक पोलीस नेमकी काय कारवाई करणार आणि रिक्षाचालक चिकणकर यांना कशाप्रकारे दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अशाप्रकारे होणाऱ्या चुकांना कसा फाटा देता येईल याबाबत देखील ट्रॅफिक पोलिसांना सजग राहावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT