Photos : रशियाचे हल्ले अन् धडपडणारे जीव! युक्रेनमधील ही काळीज पिळवटून टाकणारी दृश्ये

मुंबई तक

दोन्ही देशातील तणाव चर्चेतून निवळेल आणि युद्धाचं दाटून आलेलं ढग नाहीस होईल, अशी आशा मनाशी बाळगणाऱ्या युक्रेनमधील नागरिकांच्या आशेवर पाणी फेरलं गेलं. रशियाच्या संसदेनं देशाबाहेर लष्कराचा वापर करण्याची परवानगी देताच रशियन फौजांनी युक्रेनवर चाल केली. गुरुवारी रशियन लष्कराने युक्रेनवर हल्ला केला. नागरिकांना लक्ष्य केलं जाणार नाही, असं सांगणाऱ्या रशियाच्या लष्कराने नागरी वस्त्यांवरही मिसाईलचा मारा केला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दोन्ही देशातील तणाव चर्चेतून निवळेल आणि युद्धाचं दाटून आलेलं ढग नाहीस होईल, अशी आशा मनाशी बाळगणाऱ्या युक्रेनमधील नागरिकांच्या आशेवर पाणी फेरलं गेलं. रशियाच्या संसदेनं देशाबाहेर लष्कराचा वापर करण्याची परवानगी देताच रशियन फौजांनी युक्रेनवर चाल केली.

गुरुवारी रशियन लष्कराने युक्रेनवर हल्ला केला. नागरिकांना लक्ष्य केलं जाणार नाही, असं सांगणाऱ्या रशियाच्या लष्कराने नागरी वस्त्यांवरही मिसाईलचा मारा केला.

त्यानंतर सुरु झाला आक्रोश आणि कुटुंबांना वाचवण्याची धडपड.

रशियाकडून हल्ला करण्यात आल्यानंतर युक्रेनच्या लष्कराने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. गुरुवारापासून सुरू झालेल्या या युद्धाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही.

रशियन लष्कराने एकाच वेळी युक्रेनच्या चौहीबाजूंनी हल्ला चढवल्यानं परिस्थिती खूपच बिकट बनली आहे.

रहिवाशी इमारतींवर हल्ले झाल्यानं नागरिकांनी मुलांबाळांसह सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

रशियाने विशेष लष्करी मोहिमेच्या आडून छेडलेल्या युद्धामुळे युक्रेन नागरिकांवर मात्र स्वतःचा देश सोडून परागंदा व्हावं लागलं आहे.

जीव वाचवण्यासाठी घरदारं सोडून अनेक युक्रेनवासीयांनी देश सोडला आहे.

यूएन अर्थात संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या मते गेल्या 48 तासांत 50 हजारांहून अधिक युक्रेनच्या नागरिकांनी देश सोडला आहे.

अचानक उद्भवलेल्या युद्धामुळे लोक स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

युक्रेनमधील रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाल्याची दृश्ये समाज माध्यमांवर फिरत आहेत.

त्याचबरोबर अनेक नागरिक प्रवासाची व्यवस्था नसल्यानं पायीचं शेजारच्या देशांमध्ये दाखल होत आहेत.

कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी लोक धडपडताना दिसत आहे. अनेकांनी भुयारी रेल्वे स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे. मात्र, या धावपळीत खाण्यापिण्याचे हालही होऊ लागली आहे.

व्लादिमीर पुतिन यांच्या एका निर्णयाने युक्रेनचं जनजीवन विस्कळीत झालं असून, आता लोकांना सर्व सुरळीत होण्याची आशा लागली आहे.

युक्रेन सरकारसह येथील नागरिक जगभरातील देशांकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.

देशावर उद्भवलेल्या संकटामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं असतानाच रशिया-युक्रेन संघर्ष थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे रशियन आणि युक्रेनचं सैन्य लढत असलं, तरी दुसरीकडे चर्चेचे दरवाजे खुले झाले आहेत.

रशियाने पाठवलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला युक्रेनने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता दोन्ही देशांमधील शांती वार्ता कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये दोन्ही देशात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp