टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सचिन वाझे यांना NIA कस्टडी वाढवण्यात आली आहे. ३ एप्रिलपर्यंत सचिन वाझे NIA च्या कस्टडीत असणार आहेत. दरम्यान प्रत्येक दिवशी या प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंनी आपण मुंबईत असल्याचं दाखवण्यासाठी डोंगरी येथील टिप्सी बारवर रेड केल्याचं भासवलं. टिप्सी […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सचिन वाझे यांना NIA कस्टडी वाढवण्यात आली आहे. ३ एप्रिलपर्यंत सचिन वाझे NIA च्या कस्टडीत असणार आहेत. दरम्यान प्रत्येक दिवशी या प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंनी आपण मुंबईत असल्याचं दाखवण्यासाठी डोंगरी येथील टिप्सी बारवर रेड केल्याचं भासवलं. टिप्सी बारचे मॅनेजर राजेंद्र शेट्टी यांनी यासंदर्भातली माहिती तपासयंत्रणांना दिली आहे.
ADVERTISEMENT
चार मार्चला हिरेन यांची हत्या झाल्यानंतर रात्री वाझे आणि त्यांचे काही सहकारी डोंगरी येथील टिप्सी बारमध्ये रेड मारत आहेत असं भासवण्यासाठी गेले. खरंतर त्यावेळी बार हा बंद होता, कोणी ग्राहकही त्यावेळी तिकडे हजर नव्हतं. सचिन वाझे यांच्यासोबत २० पोलीस अधिकारी हजर होते. या रेडदरम्यान सर्व पोलिसांनी मास्क घातला होता. चार मार्चला रात्री साडेअकरा वाजता वाझे या बारमध्ये आले आणि यानंतर बारचे कागदपत्रं तपासण्याच्या बहाण्याने अडीच वाजेपर्यंत थांबले होते. मात्र या रेडमध्ये वाझे यांच्या पथकाला काहीही अवैध हाती न लागल्यामुळे रात्री अडीचनंतर ते पुन्हा बारबाहेर पडले. एटीएसच्या पथकाला इथलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे.
दरम्यान, विरोधीपक्षातील भाजप अजुनही हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सत्ताधारी पक्षात असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करतोय. भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत, हिरेन यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला.
हे वाचलं का?
Sachin Vaze यांनी १६ फेब्रुवारीच्या रात्री फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणली होती भली मोठी रक्कम
५ मार्च रोजी मुंब्रा खाडी परिसरात हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी हिरेन यांच्या गळ्याभोवती रुमाल आढळले होते. प्राथमिक तपासात हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं…परंतू यानंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. परंतू हिरेन यांच्या गळ्याभोवत रुमाल सापडल्याची बाब पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमुद का नाही असा सवाल शेलार यांनी विचारला. “पोस्टमार्टेम होत असताना त्याचं पूर्णपणे चित्रीकरण करण्यात आलं नाही, त्यावेळी फक्त ७-८ मिनीटांचं चित्रीकरण करण्यात आलं. ज्यामुळे पुरेसे पुरावे मिळू शकले नाहीत. या घटनेचं चित्रीकरण पूर्णपणे का करण्यात आलं नाही याचाही तपास NIA ने करायला हवा. यामागे कोणत्या अधिकाऱ्याचा किंवा मंत्र्यांचा दबाव होता याचाही तपास व्हायला हवा,” असं शेलार म्हणाले.
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण जाहीर करण्यात आलं नव्हतं. “ हिरेन यांच्या मृतदेहावर गरज नसातानाही Diatom tests करण्यात आली. मुंबईतील कलीना येथील फॉरेन्सिक लॅबनेही अशा प्रकारे Diatom tests करण्यासाठी परवानगी नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर या प्रकरणातले अहवाल जे.जे.हॉस्पिटलमध्ये मान्यता नसलेल्या लॅबला पाठवण्यात आले. कोणाच्या सांगण्यावरुन हे अहवाल जे.जे. रुग्णालयातील लॅबमध्ये पाठवण्यात आले, असा सवाल शेलार यांनी विचारला. NIA ने जर मला विचारलं तर मी त्या मंत्र्यांचं नाव घेईन असंही शेलार म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT