संजीव पलांडेंनी कधीही पैसे मागितले नाहीत; सचिन वाझेची आयोगासमोर माहिती

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाची राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चांदीवाल आयोगाकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांच्यावरही आरोप झालेले आहेत. दरम्यान, आयोगासमोर झालेल्या सुनावणी वेळी संजीव पलांडे यांनी कधीही पैसे मागितले नाही, असा खुलासा सचिन वाझेने केला आहे.

ADVERTISEMENT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांचा एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, आयोगाला सचिन वाझे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

सचिन वाझे यांनी सक्तवसुली संचलनायाकडे शपथेवर आरोप केला होता की, अनिल देशमुख यांनी त्यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये स्वीकारले होते. मात्र, चांदीवाल आयोगासमोर बोलताना मात्र, त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

संजीव पलांडे यांच्यावतीने वकील शेखर जगताप यांनी आयोगासमोर सचिन वाझे यांना पैशासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर वाझेने नकारार्थी उत्तर दिलं. शेखर जगताप वाझेला म्हणाले की, “संजीव पलांडे यांनी कोणत्याही कारणासाठी कधी तुमच्याकडे पैशाची मागणी केली होती का?” त्यावर विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या सचिन वाझेने ‘नाही’, असं उत्तर दिलं.

परमबीर सिंह-सचिन वाझे आयोगासमोर काय म्हणालेत? हा व्हिडीओ बघा

ADVERTISEMENT

वाझेने काय केला होता आरोप?

ADVERTISEMENT

“तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जुलै 2020 मध्ये मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्याबद्दल अनिल देशमुख आणि अनिल परब हे नाखुश होते. या यादीतील पोलीस अधिकाऱ्यांनी 40 कोटी रुपये जमवले. त्यापैकी 20 कोटी देशमुख यांना, तर २० कोटी परब यांना देण्यात आल्याचं मला नंतर कळलं,’ असा आरोप वाझेनं केलेला आहे.

“परमबीर सिंह यांचे आरोप ऐकीव माहितीवर”

“मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी (परमबीर सिंह) आयोगासमोर हजर होऊ इच्छित नाही. त्यांना जे काही सांगायचं होतं, ते त्यांनी मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आधीच सांगितलं आहे.” परमबीर सिंह यांना काही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली होती. नक्की काय घडलं, याबद्दल त्यांना प्रत्यक्षात कोणतीही माहिती नाही. याचाच अर्थ त्यांनी दिलेली माहिती केवळ ऐकीव आहे. त्यामुळे त्यांनी साक्ष नोंदवली असती, तरी त्याला कायद्यात काही किंमत नाही. कारण हे सगळं त्यांना इतर कुणीतरी सांगितलं. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये,” परमबीर सिंह यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी चांदीवाल आयोगाला सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT