समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचा गुगल, फेसबुक आणि ट्विटरविरोधात दावा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुगल, फेसबुक आणि ट्विटर यावरून होणारी बदनामी रोखण्यासाठी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी आता कोर्टात दावा दाखल केला आहे. गुगल, फेसबुक आणि ट्विटरवर होणारी आमची आणि आमच्या नातेवाईकांची बदनामी रोखण्याची विनंती या दाव्यामध्ये करण्यात आली आहे. या तिन्ही माध्यमांतून आमची आणि आमच्या नातेवाईकांची बरीच बदनामी झाली आहे. ती रोखण्यासाठी आता आम्ही कोर्टात धाव घेतली आहे असंही या दोघांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

नोव्हेंबरमध्ये खटला दाखल करण्यात आला आणि या कंपन्यांचे भारतातील पत्ते देण्यात आले. मात्र या कंपन्यांनी न्यायालयात येऊन सांगितले की, परदेशातील त्यांच्या मुख्य कंपन्यांना या याचिकेत पक्षकार बनवण्याची गरज आहे, आम्हाला नाही. यदुनाथ भार्गवन, रोहन जनार्दनन, सृष्टी पंजाबी, बाला मेनन आणि यामिनी साबू हे वकील वानखेडेससाठी हजर झाले आहेत आणि त्यांनी आवश्यक ती खबरादारी आता घेतली आहे.

हे वाचलं का?

दाव्यात असे म्हटले आहे की प्रतिवादी कंपन्या ‘वानखेडेंच्या विरोधात बदनामी आणि बदनामी मोहिमेविरुद्ध कोणतीही पावले उचलण्यात त्यांच्या वगळण्याच्या कृतींद्वारे अयशस्वी ठरल्या आहेत, जे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे सुरू आहे ज्यावर कंपन्यांचे संपूर्ण नियंत्रण आहे.’ खटल्यात सर्व बदनामीकारक मजकूराचा चार्ट तयार करण्यात आला आहे. Twitter वर 18 URL लिंक्सची यादी आहे ज्यात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा समावेश आहे. मलिक विरूद्ध वानखेडे यांची एक कायेदशीर लढाई कोर्टात सुरू आहे. फेसबुकच्या काही लिंक्स आणि युट्यूबही लिंक्सही यामध्ये देण्यात आले आहेत.

दाव्यात असेही नमूद करण्यात आले आहे की, ‘सर्व आरोप फक्त सोशल मीडियावर आणि काही राजकीय नेत्यांद्वारे केले जातात आणि राजकीय विश्लेषक, न्यूज अँकर इत्यादी नावांचा वापर करून फसवणूक केली जाते. या सर्वांनी आपली नागरी भावना, विवेक, नैतिकता इत्यादी विकल्या आहेत असाही आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे-किरण गोसावी यांच्यात काय बोलणं झालं? प्रभाकर साईलने NCB ला काय सांगितलं?

ADVERTISEMENT

दाव्यात असे म्हटले आहे की आयटी कायदा, 2000 आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार, डिजिटल कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अशी चुकीची माहिती, बदनामीकारक आणि अवमानकारक विधानांना परवानगी दिली जाणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. अशा बेकायदेशीर वर्तनाचा निषेध करणे वैधानिकरित्या आवश्यक आहे असंही नमूद करण्यात आलं आहे.

समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि इतर आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांनी केलेली ही कारवाई म्हणजे बनाव असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी रोज पत्रकार परिषद मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यानंतर समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत असाही आरोप केला होता. त्यांच्या आरोपांना समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी उत्तरंही दिली होती. आता गुगल, फेसबुक आणि ट्विटर विरोधात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT