'आमच्या मुलांना का मारलं? युद्ध थांबवा..', मेहबुबा मुफ्तींना रडू कोसळलं, सरकारला केलं मोठं आवाहन!

मुंबई तक

Mehbooba Mufti On India-Pakistan War : पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) च्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर सूचक विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

Mehbooba Mufti On India-Pakistan War
Mehbooba Mufti On India-Pakistan War
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

point

"आमच्या मुलांना का मारलं जात आहे? आता हा रक्तपात..."

point

मेहबुबा मुफ्ती नेमकं काय म्हणाल्या?

Mehbooba Mufti On India-Pakistan War : पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) च्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर सूचक विधान केलं आहे. श्रीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या भावुक झाल्या. महबुबा मुफ्ती म्हणाल्या, नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूला मारल्या जाणाऱ्या मुलांना पाहून मी पूर्णपणे तुटलो आहे. यामुळे मी खूप दु:खी आहे. सैन्य करवाईतून कोणत्याही प्रकारचं समाधान मिळणार नाही. 

मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

"एकीकडे भारत सरकार दावा करत आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. तर दुसरीकडे पाकिस्तान म्हणतोय, त्यांनी भारताचे पाच फायटर जेट खाली पाडले आणि पूंछमध्ये ब्रिगेड मुख्यालयालाही निशाणा बनवला. हिशोब बरोबर झाला आहे. मग आमच्या मुलांना का मारलं जात आहे? आता हा रक्तपात थांबला पाहिजे", मेहबुबा मुफ्ती यांनी ही परिस्थिती खूप चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा >> India Pakistan War: मुंबईतील 23 वर्षीय जवान बॉर्डरवर शहीद, पाकिस्तानसोबत लढताना वीरमरण 

सामान्य लोक, विशेषत: मुलांच्या मृत्यूनं खूप दु:ख झालं आहे. दोन्ही देशांनी लढाई करण्याऐवजी एकमेकांशी संवाद केला पाहिजे. जेणेकरून शांतता निर्माण होईल आणि निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही, असंही मुफ्ती म्हणाल्या. महबुबा मुफ्ती पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला सांगतात की, युद्ध करू नका. युक्रेन युद्धाबाबत मोदींनी म्हटलं होतं की, हे युग युद्धाचं नाही. संवाद करण्याचं आहे. 

मोदींनी फोन उचलून शहबाज शरीफ (पाकिस्तानचे प्रधानमंत्री) यांच्याशी संवाद साधला पाहिजे.मुफ्ती यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याचं आवाहन करत म्हटलं, रक्तपात आता थांबला पाहिजे. या परिस्थितीत महिला आणि मुलांचा काय दोष आहे? महिला आणि लहान मुलांना टार्गेट का केलं जात आहे? पाकिस्तानची परिस्थितीही ठीक नाहीय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला पाहिजे. 

हे ही वाचा >> IPL 2025 Suspended: अजिबात नाराज व्हायचं नाही, IPL चाहत्यांसाठी आता BCCI कडून मोठी घोषणा!

हे वाचलं का?

    follow whatsapp