पाकिस्तानने पुन्हा केला मोठा गोळीबार! उरी, पूंछसह या भागात केला हल्ला, PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय ठरलं?
Pakistan Ceasefire Violation : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा गोळीबार केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाकिस्तानने LOC वर पुन्हा केला मोठा गोळीबार

या भागात भारताने केलं ब्लॅकआऊट

PM मोदींनी सेन्य दलाच्या प्रमुखांसोबत घेतली बैठक
Pakistan Ceasefire Violation : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा गोळीबार केला आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील उरी,तंघधार, पूंछमध्ये हल्ला केला आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू विमानतळ, उरीमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे.
तर राजोरीत सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. चंदीगढमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला माजी ऐअर फोर्स चीफ, आर्मी चीफ, नेव्ही चीफ यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
हे ही वाचा >> 'आमच्या मुलांना का मारलं? युद्ध थांबवा..', मेहबुबा मुफ्तींना रडू कोसळलं, सरकारला केलं मोठं आवाहन!
पंतप्रधान मोदींनी सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत घेतली मोठी बैठक
मोदींनी या सर्व अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केलीय.भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 24 विमानतळे 14 मे पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून पूंछमध्ये तोफ गोळाबारीही करण्यात आली आहे. 11 तासानंतर पुन्हा एकदा पूंछमध्ये गोळीबार सुरु झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील शाहपूर केरनी आणि देघवर सब सेक्शनमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू येथील एअरस्ट्रीपवर रॉकेट हल्ला केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत S-400 च्या माध्यमातून पाकिस्तानचे 8 मिसाईल्स निकामी केले. तसच पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 जेटही पाडलं. पाकिस्तानने सांबामध्येही ेठा गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामुळे जम्मूतील आरएसपुरा परिसरात ब्लॅकआऊट करण्यात आलं होतं.