समीर वानखेडे मुस्लीमच, ते रमजानचे उपवासही करतात; पहिल्या सासऱ्याने केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या महाराष्ट्रात एक सामना चांगलाच रंगला आहे. तो आहे नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर जाऊन छापा मारला. त्यावेळी त्यांनी आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना अटक केली. त्यानंतर काही दिवसातच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB ने हे सगळा बनाव रचल्याचा आरोप केला होता. आता हे सगळे आरोप व्यक्तीगत पातळीवरही होत आहेत. समीर वानखेडे यांनी धर्म बदलला का? त्यांनी पहिलं लग्न कसं केलं? दाऊद वानखेडे असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. असे सगळे आरोप नवाब मलिक यांनी केले. ते आरोप खोडण्यातही आले. अशात आता या आरोपांमध्ये आणखी एक भर पडली आहे.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील म्हणजेच समीर वानखेडे यांचे पहिले सासरे यांनी या प्रकरणी एक वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा होते आहे. समीर वानखेडे यांची पहिली पत्नी शबाना कुरेशी यांचे वडील डॉ. जायेद कुरेशी यांनी मुंबई तकशी संवाद साधला आहे.

काय म्हणाले डॉ. जायेद कुरेशी?

हे वाचलं का?

‘माझ्या मुलीचं लग्न मुस्लिम कुटुंबातच झालं. दाऊद वानखेडे, जायेदा वानखेडे स्थळ घेऊन आले होते.लग्नाच्या दहा महिने आधी मुस्लिम धर्माप्रमाणे साखरपुडाही झाला. समीर हे नमाझी मुस्लिम आहेत. ते रमझानमध्ये रोझेही ठेवतात. दाऊद वानखेडे यांनी निकाहनाम्यावर समीह केली आहे. समीर वानखेडेंची आई मुस्लिम होती. समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी बदलल्या. समीर वानखेडे आणि शबाना म्हणजेच माझ्या मुलीचा तलाक का झाला यामध्ये मी पडणार नाही.’ असं आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या सासऱ्यांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

झायदा यांच्याशी लग्न झालं तेव्हा समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला. मुस्लीम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न झालं नसतं. ते आधीचे कागदपत्रं दाखवत आहेत. लग्नानंतरचे दाखवत नाहीत. झायदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर ते दाऊद झाले. ते आधी हिंदू होते का याबद्दल माहिती नाही. पण लग्न केलं तेव्हा दाऊद मुस्लिमच होते असंही डॉ. कुरेशी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे विरूद्ध नवाब मलिक असाही सामना आपल्याला राज्यात रंगलेला पाहण्यास मिळतो आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून व्यक्तीगत पातळीवर आरोप करत आहेत. समीर दाऊद वानखेडे असा ट्विटरवर त्यांचा केलेला उल्लेख, समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र, त्यांचा निकाहनामा या सगळ्या गोष्टी नवाब मलिक यांनी समोर आणल्या आहेत.

समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावर दाऊद नाव कसं आलं? ज्ञानेश्वर वानखेडेंनी दिलं उत्तर..

दुसरीकडे समीर वानखेडे, त्यांची पत्नी क्रांती रेडकर, त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक हे गुंडगिरीचा वापर करत आहेत त्यांना समीर वानखेडे यांना पदावरून हटवायचं आहे त्यामुळे ते असे बेछुट आरोप करत आहेत असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे. अशात आता समीर वानखेडेंच्या विरोधात चार तक्रारी दाखल झाल्याने मुंबई पोलीस दलातील चार अधिकारी या आरोपांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी कदाचित वाढण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT