आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न, नंतर दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवलं; मामाने भाच्याचा काटा काढला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगलीच्या खिलारवाडी येथे गुन्ह्याची एक अजब घटना समोर आली आहे. मामाने आपल्याच भाच्याला संपवल्याचं समोर येतंय. या हत्येमागचं कारण म्हणजे भाच्याचे आपल्या मुलीसोबत असणारे प्रेमसंबंध…महत्वाची गोष्ट म्हणजे भाच्याने आधी एका मामाच्या मुलीशी लग्न केलं होतं. यानंतर त्याने दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवून आणलं. त्यामुळे संतप्त झालेल्या मामाने आपल्याच भाच्याचा काटा काढला.

ADVERTISEMENT

या घटनेतील मृत तरुणाचं नाव हे नाना लोखंडे असून तो २२ जूनपासून बेपत्ता होता. नाना लोखंडे हा जत तालुक्यातील खिलारवाडीला राहत होता. नाना घरातून बेपत्ता झाल्यानंतर घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यावरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना कर्नाटकातील विजापूर येथे एक मृतदेह सापडला, तो मृतदेह नानाचा असल्याचं समोर आलं. मृतदेहाची अवस्था पाहता नानाचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. या दृष्टीने तपास केला असता या प्रकरणातलं सत्य समोर आलं.

नाना लोखंडे याचं त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न झालं होतं. असं असतानाही नानाने त्याच्या दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवून आणलं. दोन आठवड्यापूर्वी या प्रकरणावरुन नाना आणि त्याच्या मामाचा जोरात वाद झाला. याच रागातून मामाने आपल्या भाच्याची हत्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी याप्रकरणी मामासोबतच हत्येत त्याला मदत करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT