संजय राऊत पुढच्या आठवड्यात फोडणार बॉम्ब; ईडीबद्दल केलं खळबळजनक विधान

मुंबई तक

मुंबई सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचं केंद्र बनलं असून, आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. किरीट सोमय्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या एका प्रकल्पात ईडीच्या संचालकाचा पैसा असल्याचा आरोप राऊतांनी केला असून, ईडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार पुढच्या आठवड्यात बाहेर काढू, असं राऊतांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांचं केंद्र बनलं असून, आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. किरीट सोमय्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या एका प्रकल्पात ईडीच्या संचालकाचा पैसा असल्याचा आरोप राऊतांनी केला असून, ईडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार पुढच्या आठवड्यात बाहेर काढू, असं राऊतांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “पालघरमधील वेवूर गावात त्यांचा (किरीट सोमय्या) एक फार मोठा प्रोजेक्ट सुरू आहे, २६० कोटी रुपयांचा. त्यांच्या मुलाच्या नावाने. त्यांच्या (किरीट सोमय्या) पत्नी मेधा सोमय्या या प्रकल्पाच्या संचालक आहेत. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे की, या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत? ही बेनामी संपत्ती ईडीच्या एका संचालकाची आहे. मी जाहीरपणे विचारलं आहे. २६० कोटींच्या या प्रकल्पात किरीट सोमय्यांचा मुलगा नील किरीट सोमय्या आणि पत्नी मेधा किरीट सोमय्या. हे कोट्यवधी रुपये यांच्या येतात कुठून?”, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीसांचा व्हीडिओ दाखवत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंना दाखवली ‘कुंडली’

“वसईतील निकॉन प्रकल्पाची जमीन वाधवानकडून घेतलेली आहे. हा हजारो शेकडो कोटींचा भ्रष्टाचार आता रोज बाहेर काढणार. तुम्हाला (किरीट सोमय्या) उत्तर द्यावं लागेल आणि ईडीच्या कार्यालयात आम्ही हजारो लोकं जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजाराची चौकशी करता ना? आम्ही महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये कसे लुटले गेले? कसा भ्रष्टाचार केला… आम्ही तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही”, असा गर्भित इशारा राऊतांनी सोमय्यांना दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp