Narayan Rane यांनी कुंडल्या काढल्या तर आम्ही संदूक उघडू, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्याला नाशिकमध्ये संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी कुंडल्या काढल्या तर आम्ही संदूक उघडू मग पळता भुई थोडी होईल असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्या […]
ADVERTISEMENT
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्याला नाशिकमध्ये संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी कुंडल्या काढल्या तर आम्ही संदूक उघडू मग पळता भुई थोडी होईल असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
लोकशाहीत नारायण राणे यांचा लोकशाहीत अनेकदा पराभव झाला आहे. आम्ही हिंमतीने काम करतो आहे. टीका ही काही शिवसेनेला नवी नाही. काय टीका करायची आहे ती करा. बाळासाहेब ठाकरे यांना कुणी विचारलं की तुम्ही काय खाता? तर ते सांगायचे की मी शिव्या खातो. आपण त्यांचीच परंपरा पुढे नेत आहोत. आपल्याला टीकेची भीती नाही मात्र मर्यादा सोडू नका असंही नारायण राणेंना संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
हे वाचलं का?
भाजप आणि आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. मात्र वैराने वागू नका असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच वैराने वागलात तर आम्हालाही तसं वागता येईल. नारायण राणे यांना भाजप कळलाच नाही. जन आशीर्वाद यात्रेमध्ये मोदींचा प्रचार करायचा, त्यांची कामं सांगायची आणि भाजपचं बळ वाढवायचं त्याऐवजी राणे शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. आमचं सरकार पाडण्यासाठी हे करत असाल तर लक्षात ठेवा आमचं सरकार पडणार नाही.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीबद्दल काय म्हणाले संजय राऊत?
ADVERTISEMENT
आज तीन पक्षांचं सरकार आहे, उद्या एकाच पक्षाचं सरकार राहणार आहे. आमचं सरकार मजबूत आहे पडणार नाही आमच्यावर टीका करायला गेलात तर तुम्ही पडाल सरकार पडणार नाही. यापुढे प्रदीर्घ काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहणार आहे. काही लोकांना पोटदुखी असू शकते, आमच्याकडे सगळे उपाय आहेत.
नाशिकमध्ये महिला आघाडी आणखी सक्षम केली जावी असं संजय राऊत यांनी सुचवलं आहे. शिवसेनेसमोर कुणी उभं राहणार नाही, सत्ता मनगटात पाहिजे, माझी सत्ता आहे ही भावना ठेवा. वातावरण भगवं आहे, लढणारा शिवसैनिक उर्जा कायम ठेवतो. आपण इथेही करेक्ट कार्यक्रम करू शकतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT