Sanjay Raut in Panaji: ‘गोव्यात ‘पॉलिटिकल कॉर्निव्हल’ सुरु’, राऊतांनी कोणाला मारला टोमणा?
पणजी: शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या गोवा दौऱ्यावर असून तेथील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते रणनिती आखत आहेत. गोव्यातील आगामी निवडणुकांवर टोमणे मारले आहेत. आज (शुक्रवार) पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले की, गोव्यात सध्या ‘पॉलिटिकल कॉर्निव्हल’ सुरू आहे. गोव्याच्या निवडणूक रिंगणात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने उडी घेतल्याने राऊतांनी हा टोमणा मारला […]
ADVERTISEMENT
पणजी: शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या गोवा दौऱ्यावर असून तेथील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते रणनिती आखत आहेत. गोव्यातील आगामी निवडणुकांवर टोमणे मारले आहेत. आज (शुक्रवार) पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले की, गोव्यात सध्या ‘पॉलिटिकल कॉर्निव्हल’ सुरू आहे. गोव्याच्या निवडणूक रिंगणात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने उडी घेतल्याने राऊतांनी हा टोमणा मारला आहे.
ADVERTISEMENT
राऊत म्हणाले की, शिवसेना गोव्यात 22 ते 25 जागा लढवणार आहे. राज्यात कोणतीही निवडणूकपूर्व युती होणार नाही. जर शिवसेना सत्तेत आली तर राज्यातील कॅसिनो बंद केली जातील. 40 सदस्यीय गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. सध्या गोव्यात भाजप सरकार आहे तर काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे.
यावेळी संजय राऊत असंही म्हणाले की, ‘टीएमसी गोव्यातही निवडणूक लढवत असल्याचे मी ऐकले आहे. दिल्ली आणि बंगालमधील राजकीय पक्ष गोव्यात निवडणूक लढवत आहेत. अनेक नेते आपली बाजू बदलत आहेत. आम्हाला वाटते की गोव्यात सध्या पॉलिटिकल कॉर्निव्हल चालू आहे.’ यावेळी राऊतांनी असा दावा केला की, गोवा हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्या आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेनेला मजबूत जनाधार आहे. शिवसेना येथे दोन दशकांपासून निवडणूक लढवित आहे. त्यामुळे सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या आम्ही गोव्याशी जोडलेले आहोत. असंही राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन सत्ता स्थापन केली तसं गोव्यात काही होण्याची शक्यता आहे का? असा सवाल संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे राजकारण गोव्यापेक्षा वेगळे आहे. गोव्यात शिवसेनेने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे विरोधकांची मते फुटणार नाहीत. आमचा स्वतःचा असा मतदार इथे आहे आणि त्या आधारावर आम्हाला बहुसंख्य जागा जिंकण्याची खात्री आहे.’
उल्लेखनीय बाब म्हणजे, गोव्याचे काँग्रेसचे माजी आमदार लुईझिन्हो फालेरो यांनी गुरुवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गोवा निवडणुकीत टीएमसीने राज्यातील सर्व 40 जागा लढवण्याची योजना आखली आहे. दुसरीकडे, ‘आप’ने देखील आधीच गोवा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्याचा निर्णय निश्चित केला आहे. मागील निवडणुकीत देखील आपने इथे निवडणूक लढवली होती.
ADVERTISEMENT
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे की, जर त्यांचा पक्ष गोव्यात विजयी झाला तर दरमहा प्रत्येकाला 300 युनिट वीज मोफत दिली जाईल आणि स्थानिक लोकांना 80 टक्के रोजगार दिला जाईल.
ADVERTISEMENT
Goa Assembly Election: ‘कोणालाही न फोडता सत्ता स्थापन केली, गोव्यात सेना 22 जागा लढवेल’
दरम्यान, या सगळ्यामुळे गोव्यातील विधानसभा निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या सगळ्यातून भाजप विरोधकांवर कशा प्रकारे मात करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT