sanjay Raut PC : ईडीचे अधिकारी भाजपचे एटीएम मशीन झालेत; राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत घेत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडा पाडणार असल्याचा इशारा दिला. यावेळी राऊतांनी ईडी आणि आयकर विभागाकडून ठराविक लोकांवरच कारवाया होत असल्याचाही आरोप केला.

ADVERTISEMENT

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत काय म्हणाले?

“ईडीला या देशातील इतर राज्यांत कुणीच भेटत नाहीये का? फक्त शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जी आघाडी झाली आहे. ते सरकार पाडण्यासाठी. दबाब आणण्यासाठी हे सुरू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. सरकार अस्थिर करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे. आयकर विभाग आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासहित ५० नावं पाठवली आहेत. सातत्याने माझ्या पत्रकार परिषदांमध्ये त्याचा उल्लेखही केलेला आहे, पण ईडी आणि आयकर विभागाला त्याची चौकशी व्हावी असं त्यांना का वाटत नाहीये?”

हे वाचलं का?

“किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्याच्या १०० बोगस कंपन्यांची यादी स्वतः दिली आहे. बघा ईडीकडे. कुणीतरी ढवंगाळे म्हणून आहे, भाजपच्या खूप जवळचे. त्यांच्या ७५ बोगस कंपन्यांची यादी मी स्वतः पाठवली. काय झालं त्याचं?”

“संपूर्ण देशात ईडीची सर्वाधिक छापेमारी, तपास हा महाराष्ट्रात होत आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांविरुद्ध कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ७ लोकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. भाजपच्या लोकांविरुद्ध ना आयटी (आयकर विभाग), ना ईडी. ते लोक मुंबईतील रस्त्यांवर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?”

ADVERTISEMENT

“इन्कम आणि टॅक्स फक्त आमच्याकडेच आहे का? इन्कम टॅक्सची जी भानामती सुरू आहे, ती सुद्ध लवकरच समोर येईल. ही भानामती कोण करत आहे, जे हे सगळं बघत आहे, त्याबद्दल लवकरच शिवसेना मोठा खुलासा करणार आहे.”

ADVERTISEMENT

“१५ फेब्रुवारीला झालेल्या माझ्या पत्रकार परिषदेत मी सुमितकुमार नरवल नावाचा उल्लेख केला होता. ईडी, आयकर विभागाकडे मी वारंवार विचारतोय. बुलंदशहरातील एक सर्वसामान्य माणूस जो दूध विकतो. चार-पाच वर्षात त्याची संपत्ती ८००० कोटींच्या पुढे गेलीये. आता तो मलबार हिल परिसरात राहतो. त्याची मोठी संपत्ती आहे. ईडी आणि आयकरने कोणता चष्मा लावला आहे? त्या चष्म्यातून जरा आमच्याकडेही पाहा.”

“ज्यांची संपत्ती दोन-चार वर्षात आठ हजार कोटी, दहा कोटींवर जाते. कुठून येते? मी देईन पुरावे. भाजपच्या कोणत्या नेत्याची बेनामी संपत्ती त्याच्याजवळ आहे, हे सुद्धा मी आधी पंतप्रधानांकडे देईन आणि नंतर जाहीर करेन.”

“महाराष्ट्रातील भाजपचा कोणता नेता आहे ज्याचा व्यवहार त्याच्यासोबत होतोय. माझ्याकडे संपूर्ण हिशोब आहे. ईडी आयटीला आम्ही सगळं सांगू. त्यानंतर आम्हाला अटकही करू शकता.”

“मागच्या पत्रकार परिषदेत मी ईडीच्या वसुली एजंटबद्दल बोललो होतो. चार आहेत. त्यात पाचवे किरीट सोमय्या आहेत. ते पाहुणे कलाकार आहेत, पण खूप महत्त्वाचे आहेत. ईडीचे मोठे अधिकारी आहेत. त्यातील काही अधिकारी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मी ऐकलं आहे की, या अधिकाऱ्याने उत्तर प्रदेशातील भाजपच्या ५० उमेदवारांचा खर्चही उचलला आहे. हे एक रॅकेट आहे. याचा अर्थ ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे.”

” मोठ्या जबाबदारीने हे बोलतोय ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपचे एटीएम मशीन बनले आहेत. त्यांच्या खंडणीबद्दलची सर्व कागदपत्रे मी पंतप्रधान कार्यालयाकडे दिली आहेत. मी पंतप्रधानांना २८ फेब्रुवारी रोजी १३ पानाचं पत्र दिलं. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे की, कचरा साफ करणं स्वच्छ भारत अभियान नाही. भ्रष्टाचाराचा कचराही साफ करायचा आहे. काळा पैसा, पांढरा पैसा, नोटबंदी सगळं यात येतं.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT