फडणवीसजी संयम ठेवा… सरकार दुसरा पेन ड्राईव्ह घेऊन समोर येईल -संजय राऊत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह विधानसभा उपाध्यक्षांकडे सोपवत गंभीर आरोप सरकारी वकिलांवर केले आहेत. राष्ट्रवादीशी संबंधित नेते आणि पोलिसांचीही नावेही फडणवीसांनी घेतली असून, या स्टिंग ऑपरेशनची सध्या चर्चा सुरू आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना संयम पाळण्याचं आवाहन केलं. “आरोप करणं विरोधी पक्षाचं कामच असतं. […]
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह विधानसभा उपाध्यक्षांकडे सोपवत गंभीर आरोप सरकारी वकिलांवर केले आहेत. राष्ट्रवादीशी संबंधित नेते आणि पोलिसांचीही नावेही फडणवीसांनी घेतली असून, या स्टिंग ऑपरेशनची सध्या चर्चा सुरू आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना संयम पाळण्याचं आवाहन केलं.
ADVERTISEMENT
“आरोप करणं विरोधी पक्षाचं कामच असतं. सनसनाटी निर्माण करतात. काल सुद्धा असा आरोप झाला. आम्ही रात्री चर्चा केली. गिरीश महाजन यांच्याविरुद्ध कुंभाड रचलं किंवा खोटं प्रकरण निर्माण केलं. महाराष्ट्रातील पोलीस असं करत नाहीत. महाराष्ट्रातील पोलिसांना देशात प्रतिष्ठा आहे. ते खोट्या कारवाया राजकीय दबावाखाली करत नाहीत. राजकीय दबावाखाली ज्यांनी आमचे फोन टॅप केले, त्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि ते कुंभाड होतं. कुंभाड रचायचं असेल, तर आम्हाला पोलिसांना ईडी आणि सीबीआयकडे पाठवावं लागेल”, असं सांगत राऊतांनी फडणवीसांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केला असल्याचं म्हटलं आहे.
गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारी वकीलांचं कुभांड – फडणवीसांचा गंभीर आरोप
हे वाचलं का?
“कुंभाड कसं रचतात? खोट्या कारवाया कशा करायच्या? राजकीय नेत्यांना खोट्या प्रकरणात कसं अडकवायचं? खोटे पुरावे, खोटे साक्षीदार कसे निर्माण करायचे? हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांना तसं प्रशिक्षण घ्यावं लागेल. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊ देणार नाही”, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.
“त्यांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केला. यामागे नक्की काय आहे कोण आहे हे स्क्रिप्ट कुणी लिहिलं आहे. भाजपचे सलीम-जावेद कोण आहे? त्यातील पात्र कोण आहे. नेपथ्य कुणाचं आहे? दिग्दर्शन कुणाचं आहे? याच्या खोलाशी सरकार जाईल आणि दुसरा पेन ड्राईव्ह घेऊन समोर येईल”, असा दावा संजय राऊतांनी केला.
ADVERTISEMENT
‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’, फडणवीसांनी विधानसभेत Pendrive देऊन केलेला प्रत्येक आरोप जसाच्या तसा…
ADVERTISEMENT
“महाराष्ट्रात असं होतं नाही. महाराष्ट्रात कुणावरही खोटा गुन्हा दाखल केला जात नाही. महाराष्ट्र आणि मुंबईतील पोलीस खोटी प्रकरण करत नाही”, असं राऊत म्हणाले.
“देवेंद्र फडणवीसजी संयम ठेवा. सर्वकाही समोर येईल. तुम्ही या राज्याचे विरोधी पक्षनेते आहात. आपण जबाबदार नेते आहात. तुम्ही जेव्हा सनसनाटी निर्माण करणारं विधान करता वा आरोप करता, त्यामुळे राज्यातील पोलिसांची प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं. स्टिंग ऑपरेशन काय असतं, ते सगळ्यांना माहिती आहे. मी त्यावर बोलणार नाही. सरकारकडून त्यावर उत्तर दिलं जाईल”, असं राऊत म्हणाले.
फडणवीसांकडून सरकारचे वाभाडे : काय आहे गिरीश महाजनांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचं प्रकरण?
“खोटे पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही. ते तेवढ्यापुरतीच सळसळ आणि खळबळ असते. खळबळ माजवणं हाच जर विरोधी पक्षाचा हेतू असेल, तर खळबळ सुद्धा माजलेली नाही. मी काल ईडीवर पुराव्यासह आरोप केले. ते खळबळजनक आहेत. मी जी प्रकरणं समोर आणली त्यावर फडणवीस का बोलत नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. राज्यपालांनी सावित्रीबाई फुलेंची चेष्टा केली, त्यावर का बोलत नाहीत?”, असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT