मोहीत कंबोज फडणवीसांना बुडवणार आहे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य
मोहीत कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे. पत्रा चाळ घोटाळा करणारा आणि पीएमसी बँक बुडवणारा मोहीत कंबोज आहे. हा मोहित कंबोज फडणवीसांना बुडवणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हल्ली हा मोहीत कंबोज फडणवीसांचा ब्ल्यू आईड बॉय म्हणजेच अत्यंत लाडका आहे असं मी ऐकलं आहे. मात्र तो त्यांना बुडवणार आहे असंही संजय राऊत […]
ADVERTISEMENT
मोहीत कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे. पत्रा चाळ घोटाळा करणारा आणि पीएमसी बँक बुडवणारा मोहीत कंबोज आहे. हा मोहित कंबोज फडणवीसांना बुडवणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हल्ली हा मोहीत कंबोज फडणवीसांचा ब्ल्यू आईड बॉय म्हणजेच अत्यंत लाडका आहे असं मी ऐकलं आहे. मात्र तो त्यांना बुडवणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
मोहीत कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा लाडका आहे. तो मात्र देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे. पत्रा चाळचा जो विषय काढला जातोय ना… ती जमीन खरेदी करणारा मोहीत कंबोज आहे. त्यामध्येही पीएमसी बँकेचे पैसे लागले आहेत. पीएमसी बँकेला बुडवून पत्रा चाळची जागा विकत घेण्यात आली. त्या ठिकाणी लक्झर कंस्ट्रक्शन नावाने मोहीत कंबोजची साईट सुरू आहे. आता या पत्रा चाळ जमिनीवरून आमच्यावर टीका करत आहेत.
हे वाचलं का?
मुलुंडच्या ‘त्या’ दलालाला जोड्याने मारू; संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले
राकेश वाधवान त्यांच्याकडून मोहीत कंबोजच्या केबीजी ग्रुपने 1 लाख 65 हजार स्क्वेअर मीटरपैकी 4557 स्क्वेअर मीटर जागा मोहीत कंबोजने 100 कोटींमध्ये घेतली. या जागेची किंमत साधारण 12 हजार कोटी आहे. लोक म्हणतात हा मोहीत कंबोज फडणवीसांचा ब्लू आईड बॉय आहे. कंबोज बायोफार्मिंग प्रा.लि., केबीजी व्हेंचर्स, आयर्न मॅन रिअल इस्टेट, तीर्थ एक्सपिरिअन्स प्रा.लि., केबीजी हॉटेल्स, स्टिक फिल्म कंपनी, शिवादी हॉटेल्स, काळभैरव व्हेंचर्स, मॅक्स मीडिया सोल्युशन्स, पीएम रिअॅलिटी या सगळ्यात कुणाचा पैसा लागला आहे? हा पैसा कुठून आला आहे? हे फक्त फडणवीसांनाच माहित आहे असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
भाजपचे काही लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की सरकारच्या प्रवाहातून तुम्ही बाहेर पडा. आम्हाला सरकार घालवायचं आहे. त्याची तयारी आम्ही केलेली आहे. राष्ट्रपती राजवट लावायची आहे किंवा काही आमदारांना हाताशी घेऊन आम्हाला सरकार पाडायचं आहे. मी त्यांना विचारलं की हे कसं शक्य आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आम्हाला मदत तुम्ही केली नाही तर केंद्रीय तपासयंत्रणा तुम्हाला टाईट करतील आणि फिक्स करतील. ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य माझ्याकडून होणार नाही असंही मला सांगितलं. सध्या पवार कुटुंबांवर धाडी पडत आहेत. ते सुद्धा प्रकरण सोपं नाही आम्ही त्यांनाही टाईट करणार आहोत असंही मला सांगण्यात आलं. स्फोटक पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT