बॉलीवुड फिल्ममेकर संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने केलं आत्मदहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड फिल्ममेकर संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने अंधेरी परिसरात स्वतःला जाळून घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गुप्ता यांच्या पत्नीचं नाव अस्मिता होतं. तर त्यांच्या मुलीचं नाव सृष्टी होतं.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीप्रमाणे, अंधेरीच्या पश्चिमेतील डीएन नगर या परिसरात सोमवारी दुपारी या दोघींनी जाळून घेतलं. ज्यावेळी शेजारच्यांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवलं. ज्यानंतर ही घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळतानाच तातडीने या दोघींनी अंधेरीच्या कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात अस्मिता यांना मृत घोषित केलं गेलं. तर सृष्टीचं शरीर 70 टक्के भाजलं होतं. सृष्टीला ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी तिचाही मृत्यू झाला.

हे वाचलं का?

अस्मिता गेल्या काही काळापासून किडनीच्या समस्येने त्रस्त होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. तर आईची अवस्था पहावत नसल्याने तिनेही आत्मदहनाचा मार्ग स्विकारला असल्याची चर्चा आहे. डीएन नगर पोलीस स्टेशनचे सीनियर इंस्पेक्टर भारत गायकवाड यांच्या सांगण्यानुसार, या दोन्ही वेगवेगळ्या एक्सीडेंटल डेथ केसेस रजिस्टर करण्यात आल्या आहे. यासंदर्भात आम्ही तपास करतोय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT