Satara Ambeghar Landslide: चिमुकल्यांसह एकाच चितेवर सहा जणांना मुखाग्नी, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: मुसळधार पावसाने साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. भूस्खलन झाल्याने येथील अनेक घरं दबली गेली आहेत. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे येथील आजूबाजूच्या अनेक भागात पाणी साठल्याने आंबेघर घटनास्थळी पोहचण्यास बराच वेळ लागला. दरम्यान, आता मागील काही तासापासून एनडीआरएफच्या टीमने (NDRF Team) बचाव कार्य सुरु केल्यानंतर आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, दुपारपासून पाऊस थांबला असल्याने एनडीआरएफची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई देखील घटनास्थळावर दाखल झाले होते.

ज्या मृतदेह सापडले त्यांना घटनास्थळीच अश्रू भरल्या डोळ्यांनी गावकऱ्यांनी मुखाग्नी दिला. दुसरीकडे दोन लहान मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबांचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता.

हे वाचलं का?

लहान मुलांचे मृतदेह चिखलाच्या ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व उपस्थित गावकऱ्यांनी हे दृश्य जेव्हा पाहिले तेव्हा प्रत्येकाचे हृदयात एकच कालवाकालव झाली. यावेळी एनटीआरचे जवानांचे निखिल यांचे हृदय देखील हळहळले.

यावेळी एकाच घरातील सहा लोकांना एकाच चितेवर मुखाग्नी दिला गेला. प्राप्त परिस्थितीमुळे प्रशासनाला हे पाऊल उचलावं लागलं. यावेळी एकाच वेळी सहाही जणांना मुखाग्नी दिल्यानंतर उपस्थितांनी एकच आक्रोश केला. जे दृश्य अगदीच हृदयात कालवाकालव करणारं होतं.

ADVERTISEMENT

दरम्यान, याचवेळी दुसऱ्या घरातील दबलेल्या सहा लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रात्री उशिरापर्यंत या उर्वरित सहा लोकांना देखील मुखाग्नी देण्यात येईल असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

याठिकाणी ढिगाऱ्याखाली एकूण तीन घरे गाडली गेली आहेत. त्यापैकी एकाच कुटुंबातील सहा लोकांना बाहेर काढण्यात आले तर दुसऱ्या घरातील सहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या ढिगाऱ्याखाली आणखी 10 ते 15 जण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेघर गावापासून सात किलोमीटर आधी पावसामुळे पूल वाहून गेल्याने घटनास्थळावर यंत्रणा पोहोचणे मुश्किल झाले होते. मात्र चौदा तासानंतर 24 जुलै रोजी अकरा वाजता NDRF ची टीम घटनास्थळावर पोहोचली.

त्यानंतर युद्धपातळीवर येथील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, यावेळी एनडीआरएफला काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी मदत करत आहेत.

Satara मधील आंबेघरमध्ये मोठी दुर्घटना, 3 जणांचे मृतदेह हाती; तब्बल 39 जण बेपत्ता

पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने आणि काही ठिकाणी रस्ते अद्यापही पाण्याखाली असल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. यावेळी प्रशासकीय यंत्रणा आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर सुरू आहे.

दुसरीकडे, पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी ढासळले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT