Satara District बँकेला ED ची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? मुख्याधिकारी म्हणतात…
ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखाना चर्चेत आला आहे. या साखर कारखान्याला दिलेल्या कर्जामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ३ जिल्हा बँकांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सातारा जिल्हा बँकेचे मुध्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी खुलासा केला असून कोणत्याही अफवेर विश्वास ठेवू नका […]
ADVERTISEMENT
ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखाना चर्चेत आला आहे. या साखर कारखान्याला दिलेल्या कर्जामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ३ जिल्हा बँकांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सातारा जिल्हा बँकेचे मुध्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी खुलासा केला असून कोणत्याही अफवेर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.
जरंडेश्वरला किती कर्ज देण्यात आलं?
“सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं २०१७ सालापासून जरंडेश्वर कारखान्यासाठी १२८ कोटीचे कर्ज वितरीत केले आहे. कारखान्याकडे सध्या ९७ कोटी ३७ लाख कर्ज शिल्लक आहे. जरंडेश्वरकडून वेळेत कर्ज फेडले जात आहे का? नेमके किती कर्ज वितरीत करण्यात आले आहे ? याविषयीची माहिती ED कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
यावेळी बोलत असताना कोणत्याही दबावापोटी कारखान्याला कर्ज देण्यात आलं नसून कारखान्याची सर्व कागदपत्र तपासून माहिती घेतल्यानंतरच कर्जाचं वितरण करण्यात आल्याचं सरकाळे यांनी स्पष्ट केलं. कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला असून त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत असल्याने आम्ही ईडीच्या नोटिशीला सक्षमपणे उत्तर देऊ, असे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले आहे.
असा आहे जरंडेश्वर कारखान्याचा आतापर्यंतचा इतिहास –
ADVERTISEMENT
-
२१ नोव्हेंबर १९८९ साली नोंदणी
ADVERTISEMENT
१९९९ मध्ये पहिला गळीत हंगाम
२००५ पर्यंत शालिनीताई पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता
२००५ ते २०१० या काळात कारखाना भाडेतत्वावर
जून २०१० मध्ये राज्य बँकेने कारखाना ताब्यात घेतला, ऑगस्टमध्ये नोटीस काढून डिसेंबर २०१० मध्ये जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव झाला.
ADVERTISEMENT