सातारा कारागृहातील कैद्याने पोलिसाला कॉलर धरून केली मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात बंदीवानाने राडा करत पोलिसाची कॉलर धरुन मारहाण केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (वय 37, रा. आंधळी ता.माण) असे संशयित आरोपीचे नाव असून सध्या तो जिल्हा कारागृहात कैदी आहे. याप्रकरणी जेल पोलिस रणजित गोपीचंद बर्गे (वय 40) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ADVERTISEMENT

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 9 व 10 रोजी अशा दोन टप्प्यात घडली आहे. दि. 9 रोजी दुपारी तक्रारदार रणजित बर्गे जेलमध्ये कर्तव्य बजावत असताना संशयिताने ‘तुला लय मस्ती आली. तुझ्याकडे बघतो’, असे म्हणत जीव मारण्याची धमकी देवून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जेलमध्ये खळबळ उडाली. इतर पोलिसांनी धाव घेवून संशयिताला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती कारागृह अधीक्षक यांना दिल्यानंतर त्यांनी दि. 10 रोजी संबंधित पोलिस व संशयिताला कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले.

दुसर्‍या वेळी प्राथमिक चौकशी सुरु असतानाच पुन्हा संशयित आरोपी काशीनाथ जाधव याने जेल पोलीस रणजित बर्गे यांची कॉलर धरत धक्काबुक्की केली. अखेर संशयिताला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT