इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक, 23 वर्षीय तरुणीचा दुर्देवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागून युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली आहे. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे शुक्रवार (20 मे) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्होप्रे येथील युवती शिवानी पाटील ही आपल्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी गेली असता तिला अचानकपणे शॉक लागला.

ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला त्वरीत उपचारासाठी कराडला रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. हा शॉक नेमका कसा लागला याचा देखील आता पोलीस तपास करणार आहेत. या प्रकरणाची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे करत आहेत.

हे वाचलं का?

तब्बल साडेसहा लाखाच्या नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बाइक जळून खाक

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस अक्षय पार्क इथं विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकींना अचानक आग लागून त्या जळून खाक झाल्याची घटना घडली होती.

ADVERTISEMENT

या आठही बाइक एका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग करण्यात आल्या होत्या. या इलेक्ट्रिक बाइकमधील एका बॅटरीने अचानक पेट घेतला. ज्यानंतर एका पाठोपाठ सुमारे 8 बाइक या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या.

ADVERTISEMENT

आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न केलेला. मात्र आगीचं स्वरुप भयंकर असल्याने ही आग विझवता आली नव्हती. त्यामुळे या आगीत तब्बल 8 वाहनांचं म्हणजे सुमारे अंदाजे साडेसहा लाखांचं नुकसान झालं होतं.

कोल्हापूरातील नागाळा पार्क परिसरातील अक्षय पार्क इथल्या प्राईम रोज या 6 मजली इमारतीत प्रदीप जाधव हे कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या मालकीचं शाहूपुरी तिसर्‍या गल्लीत गाड्यांचं शोरूम आहे. बॅटरीवरील वाहनांची एजन्सी असल्याने या वाहनांची विक्री ते करतात. त्यामुळेच सुमारे 12 वाहनांचा लॉट त्यांना मिळाला होता.

वाहनं लावण्यासाठी शोरूममध्ये जागा नसल्यानं त्यांनी प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीची ही वाहनं त्यांनी ते राहात असलेल्या प्राईम रोज अपार्टमेंटच्या तळमजल्यावर पार्क केल्या होत्या. या दुचाकींपैकी एका वाहनातील बॅटरीने अचानक पेट घेतलेला. ज्यानंतर एकापाठोपाठ एक अशा सर्वच बाइकने पेट घेतला.

डोंबिवली: बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे पडायचे कमी, लाड पुरविण्यासाठी तरुण चोरायचा बाइक

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक बाइकमधील बॅटरीने पेट घेण्याचा घटना या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता यावर उपाय काढण्याचं मोठं आव्हान तंत्रज्ञांसमोर असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT