पुण्यातील मटका व्यवसायिकाची हत्या : भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सहभाग उघड, आरोपी अटकेत
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील शिरवळ भागात पुण्यातील एका मटका व्यवसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिरवळ पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून या प्रकरणातला मुख्य आरोपी भाजपचा पदाधिकारी असल्याचं कळतंय. अमोल हुलावळे असं या आरोपीचं नाव असून तो पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात राहतो. तसेच अमोल हुलावळे हा भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील शिरवळ भागात पुण्यातील एका मटका व्यवसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिरवळ पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून या प्रकरणातला मुख्य आरोपी भाजपचा पदाधिकारी असल्याचं कळतंय.
अमोल हुलावळे असं या आरोपीचं नाव असून तो पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात राहतो. तसेच अमोल हुलावळे हा भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे.
चंद्रपूर : पतीपासून वेगळं राहत असलेली मुलगी राहिली गर्भवती; आईने सुपारी देऊन केली हत्या
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पुण्यातील बिबवेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या मटका किंग संजय पाटोळे (वय ३६) यांच्या हत्येत BJP पदाधिकारी अमोल हुलावळे याचा हात असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी आरोपी हुलावळे याला अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मटका व्यवसायिक संजय पाटोळेची हत्या का करण्यात आली याचा शिरवळ पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या
ADVERTISEMENT
आरोपी अमोल हुलावळे याचा भारती विद्यापीठ परिसरात मोठा दबदबा आहे. तो या भागात गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो. अमोल हुलावळेने आगामी महापालिका निवडणुक लढवण्याचीही तयारी केली होती.
ADVERTISEMENT
कोल्हापूर : घरगुती वादातून उच्चशिक्षीत मुलीने केला वडिलांचा खुन, स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
ADVERTISEMENT