आजपासून महाराष्ट्रात शाळा सुरू! कुठल्या जिल्ह्यांत शाळा अद्यापही बंद? वाचा सविस्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना आणि ओमिक्रॉनच्या संकटामुळे राज्यभरातल्या पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र गुरूवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत 24 तारखेपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे तिथे शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. असं असलं तरीही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार पालकांना जे योग्य वाटतं तो निर्णय विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांनी घ्यावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

वाढत्या कोरोना संकटामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ‘या’ राज्यांमध्येही शाळा बंद

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

हे वाचलं का?

सोमवारपासून राज्यात शाळा सुरू होत असल्या तरीही पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे.पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. मात्र, अनेक जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसतं आहे. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. तर, नागपुरात 26 जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आजपासून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.. नाशिकमधील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. तर शाळेत विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येईल. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. यवतमाळ जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. नववी वी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय.

ADVERTISEMENT

धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता नववी ते बारावीच्या 420 शाळा सुरू होतील. नववी ते बारावीच्या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून पहिल्या आठवड्यानंतर उर्वरित शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. शाळेचे कामकाज फक्त तीन तास चालणार असून प्रत्येक शाळेत वैद्यकीय कक्ष बंधनकारक करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात आजपासून शहरी भागातील आठवी ते 12 वीपर्यंत तर ग्रामीण भागातील पहिली ते बारावी पर्यतचे वर्ग उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शाळा आजपासून पहिली ते बारावी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत.

वाशिम, अमरावतीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुग राजन एस यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त दहावी, बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT