शाहरुख खानच्या ‘मन्नत’चे खरे नाव काय, किती कोटींमध्ये खरेदी केला होता बंगला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: सध्या सुपरस्टार शाहरुख खानचं (Shah rukh Khan) घर ‘मन्नत’ (Mannat) हे खूपच चर्चेत आहे. ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शनिवारी किंग खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ‘मन्नत’मध्ये परतला आहे. शाहरुख खानचा हा बंगला मुलाच्या स्वागतासाठी सजवण्यात आला होता. दुसरीकडे मन्नतच्या बाहेर चाहत्यांची प्रचंड झुंबड पाहायला मिळाली. या सर्व कारणांमुळे गेले काही दिवस आर्यनसोबतच ‘मन्नत’ देखील बरंच चर्चेत होतं. पण शाहरुख-गौरीच्या या ‘मन्नत’ खरं नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे?

ADVERTISEMENT

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याचे खरे नाव काय आहे?

मुंबईतील स्टार्सच्या आलिशान बंगल्यांमध्ये ‘मन्नत’चाही समावेश आहे. याला मुंबईचे आयकॉनिक प्लेस असेही म्हणतात. किंग खानचे चाहते मुंबईत येतात आणि ‘मन्नत’च्या बाहेर उभे राहून येथे अनेक फोटो काढतात.

हे वाचलं का?

शाहरुख खानने 1997 मध्ये येस बॉस चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ‘मन्नत’ बंगला पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हाच शाहरुख खानने ठरवले होते की, तो एक दिवस हा बंगला नक्की विकत घेईल. त्यावेळी या बंगल्यात एक गुजराती उद्योजक राहत होते.

ज्यांचं नाव नरिमन दुबास असं होते. तेव्हा या बंगल्याला म्हणजे आत्ताच्या ‘मन्नत’ला नाव व्हिला व्हिएन्ना (Villa Vienna)असं नाव होतं.

ADVERTISEMENT

2001 साली शाहरुख खानने पहिल्यांदा या बंगल्याच्या मालकाची भेट घेतली आणि त्यानंतर किंग खानने हा बंगला Bai Khorshed Bhanu Sanjana Trust नावे विकत घेतला.

ADVERTISEMENT

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने त्यावेळी हा बंगला तब्बल 13.32 कोटींना खरेदी केला होता. आज त्याची किंमत ही 200 कोटींच्या आसपास आहे.

शाहरुख खानने बंगला विकत घेतल्यानंतर 4 वर्षांपर्यंत हा व्हिला व्हिएन्नाच्या नावावर नोंदणीकृत होता. त्यानंतर 2005 मध्ये या बंगल्याचे अधिकृत नाव ‘मन्नत’ असे ठेवण्यात आले.

Aryan Khan: आर्यन खान 28 दिवसांनी ‘मन्नत’वर परतला, जाणून घ्या ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण Timeline

शाहरुख खान हा मागील काही दिवसांपासून आर्यन खानच्या अटकेमुळे बराच अस्वस्थ होता. त्याने आपलं सगळं शूटिंग देखील यामुळे रद्द केला होतं. पण आता तो पुन्हा एकदा लवकरच आपल्या कामात व्यस्त होईल.

वर्कफ्रंटचा विचार केल्यास त्याच्या अनेक चित्रपटांचं शूटिंग आता सुरु आहे. ‘झिरो’सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर शाहरुख खानने आपल्या चित्रपटांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली आहे. आता ‘पठाण’ हा शाहरुखचा आगामी चित्रपट आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण शाहरुख खान सोबत दिसणार आहे.

तर जॉन अब्राहम देखील पठाणमध्ये किंग खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT